-
प्रतिनिधी
राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास (Khaki Uniform) मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असणार आहे. त्याचबरोबर कामगार दिनाचे औचित्य साधून हा खाकी गणवेश (Khaki Uniform) दिनांक १ मे २०२५ पासून राज्यभरात अंमलात येणार असल्याची घोषणा मंत्री फुंडकर यांनी केली.
महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या खाकी रंगाच्या गणवेशाचे (Khaki Uniform) अनावरण बुधवारी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते नरिमन भवन, मुंबई येथे करण्यात आले.
(हेही वाचा – ICSE results 2025: दहावीचा निकाल जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या कन्येनेही मारली बाजी)
सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाचा (Khaki Uniform) रंग खाकी असावा, अशी मागणी विविध संघटना व सुरक्षारक्षकांनी शासनाकडे केली होती. कामगार मंत्री यांनी ही मागणी मान्य करत केली आहे. राज्यभरात जिल्हानिहाय १६ सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत असून आता १ मे पासून राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या गणवेशात एकसमानता असणार आहे.
या उपक्रमामुळे सुरक्षा रक्षकांची ओळख एकसंध राहील व त्यांच्या शिस्तबद्धतेत भर पडेल. तसेच या नव्या गणवेशामुळे (Khaki Uniform) राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक सुसंगत व व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचेही कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community