भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक ठरलेल्या ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) सोशल मीडियात पोस्ट टाकून टीका करणाऱ्या पुण्यातील १९ वर्षीय मुस्लिम मुलीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी अटक केलेल्या पुण्यातील १९ वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थिनीला जामीन मंजूर केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुण्यातील सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंगमधील आयटी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी खादिजा शेख हिला ९ मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान भारत-पाक युद्धादरम्यान भारत सरकारवर टीका करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकल्याबद्दल तिला अटक करण्यात आली होती. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२ आणि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहर पोलिसांसह, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि गुप्तचर संस्था या प्रकरणाच्या चौकशीत सामील झाल्या.
(हेही वाचा पश्चिम रेल्वेवर शनिवारपासून 36 तासांचा Mega Block; 162 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना मोठा फटका)
न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीतील खंडपीठाने म्हटले की, पोलिस अधिकाऱ्यांनी खादिजा शेखला अटक करून तिचे शिक्षणात आयुष्य उद्धवस्त करत आहे, असे सांगत न्यायमूर्ती गोडसे यांनी सध्या पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या त्या मुस्लिम मुलीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. तिच्याविरुद्ध काढण्यात आलेला रेसिटेशन आदेश स्थगित करत आणि संस्थेला तिला हॉल तिकीट देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, विद्यार्थिनीला स्पष्टीकरण देण्याची संधी न देता घाईघाईने तिला अटक करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे म्हटले. विद्यार्थिनीने पोस्ट (Operation Sindoor) ताबडतोब डिलीट केली होती, पश्चात्ताप व्यक्त केला होता आणि त्याबद्दल माफी मागितली होती, त्यामुळे तिला अजिबात अटक करायला नको होती.