Kejriwal Government : दिल्लीत शिक्षण संस्था स्थापन करण्याचे दावे पोकळ?; भाजपने कोणते आरोप केले आहेत ते जाणून घ्या

केजरीवाल सरकार(Kejriwal Government) मद्य घोटाळ्याचे सरकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या आम आदमी पक्षात विद्यार्थी संघटनेची पुन्हा सुरुवात करणे म्हणजे जुनेच मद्य पुन्हा नवीन बाटलीत भरण्यासारखेच आहे. दिल्ली भाजपने या मुद्द्यावर याआधीच्य सत्ताधाऱ्यांवर म्हणजे केजरीवाल सरकारवर केली आहे.

282

केजरीवाल सरकार(Kejriwal Government) मद्य घोटाळ्याचे सरकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या आम आदमी पक्षात विद्यार्थी संघटनेची पुन्हा सुरुवात करणे म्हणजे जुनेच मद्य पुन्हा नवीन बाटलीत भरण्यासारखेच आहे. दिल्ली भाजपने या मुद्द्यावर याआधीच्य सत्ताधाऱ्यांवर म्हणजे केजरीवाल सरकारवर केली आहे.

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकार(Arvind Kejriwal)ने शिक्षण सुधारण्याचे अनेक दावे केले होते. शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती वाटण्यात आल्याचेही समोर आले होते. परंतु, दिल्लीत भाजप सत्तेत येताच आम आदमी पक्षाचे सत्य बाहेर येऊ लागले. दिल्ली भाजप अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या कार्यकाळात उच्च शिक्षणाचा स्तर स्थापित करण्याचे केलेले दावे त्यांच्या इतर दाव्यांप्रमाणेच पोकळ ठरले आहेत.

(हेही वाचा Jyoti Malhotra आणि आयएसआय एजंटचे चॅट्स समोर; “अटारी बॉर्डरवर कुणी अंडर कव्हर…” )

दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले की, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या १० वर्षांच्या राजवटीतही ९० टक्के सरकारी शाळांमध्ये विज्ञान शिकवले जात नाही तर तीन-चतुर्थांश शाळांमध्ये वाणिज्य, हेच केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक धोरणाचे पर्दाफाश करते. तसेच, तल्कालीन केजरीवाल सरकार(Kejriwal Government) दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये ९वी आणि ११वीच्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नापास करत राहिले जेणेकरून दहावी आणि बारावीचे निकाल सर्वोच्च दाखवता येतील, अशापध्दतीने भाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा भांडाफोड करण्यात आला.

आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेवर प्रश्नचिन्ह

दिल्ली भाजपने म्हटले आहे की अरविंद केजरीवाल यांनी पक्षात विद्यार्थी संघटना स्थापन करणे हास्यास्पद आहे. केजरीवाल सरकार(Kejriwal Government)ला मद्याचे सरकार म्हणून ओळखले जाते आणि आज त्यांच्या पक्षात विद्यार्थी संघटना पुन्हा सुरू करणे हे जुन्या दारूला नवीन बाटलीत भरण्यासारखे वाटते. ज्या पक्षाला १० वर्षांच्या सत्तेत असताना दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेत एकही उमेदवार जिंकता आला नाही, त्यांनी सत्ता गमावल्यानंतर विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचा दावा अत्यंत हास्यास्पदच म्हणावा लागेल.(Kejriwal Government)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.