उत्तराखंडमध्ये आज, रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राज्यातील रुद्रप्रयागच्या गौरीकुंड परिसरात हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये 7 जण होते. यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांचा समावेश आहे. या अपघातामुळे यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यावरही शोककळा पसरली आहे. (Kedarnath Helicopter Crash)
(हेही वाचा – Malegaon Bangladeshi : १२३ जणांची जन्मतारीख १ जानेवारी; किरिट सोमय्या म्हणाले, कारवाई होणारच)
यासंदर्भातील माहितीनुसार आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर प्रवाशांना घेऊन जात असताना पहाटे 5.30 वाजता गौरीकुंड (Gaurikund) परिसरात कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली. या दुर्देवी अपघातातील मृतांमध्ये विक्रम (रुद्रप्रयाग उत्तराखंड) विनोद देवी ( बिजनौर उत्तरप्रदेश) तुस्ती सिंह (बिजनौर उत्तरप्रदेश), राजकुमार जयस्वाल (यवतमाळ, महाराष्ट्र), शारदा जयस्वाल (यवतमाळ, महाराष्ट्र), काशी (यवतमाळ, महाराष्ट्र) आणि कॅप्टन राजीव रेसी (राजस्थान) यांचा समावेश आहे. अपघाताला बळी पडलेले जयस्वाल कुटुंबिय महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी आहेत. तसेच मृतांमध्ये जयस्वाल कुटुंबातील काशी या अडीच वर्षीय बालिकेचा देखील समावेश आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) यांनी हेलिकॉप्टर अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी, 8 मे रोजी राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यात देखील एक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत पायलटसह 6 जणांचा मृत्यू झाला होता. (Kedarnath Helicopter Crash)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community