केदारनाथ यात्रेला (Kedarnath Dham 2025) आजपासून (2 मे) सुरूवात झाली असून त्यासाठी देशभरातले भक्तगण दाखल झालेत. सकाळी सात वाजता केदारनाथचे दरवाजे उघडले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री धामी यांनी यावेळी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी संवाद साधला. रात्री 10 वाजल्यापासून भाविक रांगेत उभे होते. पहलगाम हल्ल्यानंतर केदारनाथ यात्रेसाठी कडेकोड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर, भाविकांना 6 महिने दर्शन घेता येईल. (Kedarnath Dham 2025)
फुले ८ राज्ये आणि ३ देशांमधून आणली
जून ते ऑगस्ट दरम्यान हवामान चांगले राहिले तर यावेळी 25 लाखांहून अधिक लोक केदारनाथ धाममध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. मंदिर १० हजार किलोग्रॅम फुलांनी सजवण्यात आले आहे. त्यात ४५ प्रकारच्या फुलांचा समावेश आहे. ही फुले ८ राज्ये आणि ३ देशांमधून आणण्यात आली आहेत. ही सजावट वडोदरा आणि कोलकाता येथील कारागीरांनी केली आहे. (Kedarnath Dham 2025)
गुरुवारी पालखी सोहळा संपन्न
बाबा भोलेनाथांची पंचमुख चलविग्रह उत्सव पालखी गुरुवारी दुपारी केदारनाथमध्ये दाखल झाली होती. भोलेनाथांच्या दर्शनासाठी १५ हजार भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले होते. यासाठी गुरुवारी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात केदारधाम दुमदुमून गेलं. (Kedarnath Dham 2025)
भाविकांसाठी मार्गदर्शक सूचना
दरम्यान, केंदारनाथ यात्रेकरूंसाठी पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंदिराच्या ३० मीटर परिघात मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात रील शूट करताना, फोटो काढताना कोणी आढळल्यास मोबाइल जप्त केले जातील, तसेच ५,००० रुपयांचा दड वसूल केला जाईल, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. (Kedarnath Dham 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community