कर्नाटकातील सिद्धरामय्या (Siddaramaiah) सरकारने शुक्रवार, ७ मार्च या दिवशी अर्थसंकल्प सादर केला. (Karnataka Budget) या अर्थसंकल्पात ७.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नवीन औद्योगिक धोरणही जाहीर करण्यात आले. कर्नाटक सरकारच्या या अर्थसंकल्पात त्यांनी मुसलमानांवर सवलतींची खैरात केली आहे.
(हेही वाचा – Maharashtra Budget: राज्यात दीड कोटी ग्राहक होणार वीजबील मुक्त; काय आहे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा मास्टर प्लॅन? )
हजारो कोटी रुपयांची तरतूद
मुसलमान मुलींसाठी १५ महिला महाविद्यालये कर्नाटक सरकार सुरू करणार आहे. वक्फ बोर्डाच्या रिकाम्या जमिनींवर सरकार ही महाविद्यालये उभारणार आहे. अल्पसंख्यांक कुटुंबांना लग्नासाठी ५०००० रुपयांची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात, इमामांचा पगार (Imam Salary Hike) वाढवून 6 हजार रुपये करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. याशिवाय, जैन पुजारी, शीख ग्रंथींनाही एवढेच वेतन मिळेल. तसेच, सहायक ग्रंथी आणि मशिदीचे मुअज्जिन यांनाही दरमहा ५००० रुपये मानधन दिले जाईल. बेंगळुरूमधील (Bangalore) हज भवनाचा (Hajj Building) विस्तार करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. येथे हज यात्रेकरू आणि त्यांच्या कुटुंबियांना आधुनिक सुविधा पुरवल्या जातील. मुख्यमंत्री अल्पसंख्याक वसाहत विकास कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. त्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पाद्वारे मुसलमानांवर सवलतींची खैरात करण्यात आली आहे.
याशिवाय कर्नाटकात २५० मौलाना आझाद मॉडेल इंग्लिश स्कूल सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या शाळा सरकारी धोरणांतर्गत सुरू केल्या जातील. यासाठी सरकारने ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीला आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात येईल. हे विद्यापीठ आता डॉ. मनमोहन सिंग बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी नावाने ओळखले जाईल. याशिवाय इतर १६ महिला महाविद्यालयेही सुरू कण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. (Karnataka Budget)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community