Kanchanjunga Train: पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताविषयी राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावना, ‘X’वर पोस्ट करत म्हणाल्या…

154
Kanchanjunga Train: पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताविषयी राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावना, 'X'वर पोस्ट करत म्हणाल्या...
Kanchanjunga Train: पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताविषयी राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावना, 'X'वर पोस्ट करत म्हणाल्या...

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे सोमवारी, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मालगाडीने कांचनगंगा एक्सप्रेसने (१३१७४) (Kanchanjunga Train) ला मागून धडक दिली. ही एक्सप्रेस आगरतळाहून पश्चिम बंगालमधील सियालदहला जात होती. या अपघाताबाबत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले आहे.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया ‘X’वर पोस्ट करून म्हटले आहे की, ‘पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झालेल्या रेल्वे अपघातातील जीवितहानीची बातमी अत्यंत दुःखद आहे. माझे विचार आणि प्रार्थना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात. मदत आणि बचाव कार्याला यश मिळावे, यासाठी मी प्रार्थना करते.’

या अपघातात कांचनगंगा एक्सप्रेसच्या ३ मोठ्या डब्यांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना नेण्यासाठी बंगाल रोडवेजच्या बसेस रवाना झाल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.