महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई (Justice Bhushan Gavai) यांची भारताचे ५२ वे सरन्यायाधीश (Chief Justice Of India) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गवई हे बुधवार १४ मे रोजी देशाचे पुढील न्यायमूर्ती म्हणून शपथ घेणार आहे. या शपथग्रहण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अमरावतीमधून (Amravati) न्या. भूषण गवई यांच्या मातोश्री माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य तसेच काही जवळची मंडळींसह अनेक जण दिल्लीला रवाना होणार आहे.
(हेही वाचा – SSC Result : ‘या’ दिवशी दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता)
अमरावतीला तिसऱ्यांदा सर्वोच्च मान
विशेष म्हणजे माजी महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून अमरावतीच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला होता. त्यानंतर बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल म्हणून दादासाहेब गवई यांना सुद्धा सर्वोच्च मान मिळाला होता. आता त्यांचेच पूत्र न्या. भूषण गवई हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून बुधवार १४ मे रोजी सकाळी ११ वाजता शपथ घेणार आहेत.
कुटुंबियांसह अनेक जाणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्या. भूषण गवई यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी न्या. गवई यांच्या मातोश्री माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, त्यांचे बंधू डॉ. राजेंद्र गवई, मुलगी कृतिका गवई, दादासाहेब गवई यांचे बंधू वसंत गवई, डॉ. विश्वास गवई, न्या. गवई यांच्या भगीनी किर्ती अर्जुन, त्यांचा मुलगा धरम अर्जुन आदी कुटुंबिय, तसेच दादासाहेब गवई यांचे मानसपूत्र रुपचंद खंडेलवाल, अॅड. विजय तायडे, डॉ. भीमराज तायडे आदींसह त्यांचे जवळचे नातेवाईक, चाहते असे अनेक जण दिल्लीला जाणार आहेत.
वकील संघाकडून सोहळा लाईव्ह
भूमीपूत्र न्या. भूषण गवई (Justice Bhushan Gavai) सरन्यायधीश पदाची शपथ घेणे हा अमरावतीच्या शिरपेचातील आणखी एक माना तुरा आणि आनंदाचा क्षण राहणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा अनेकांना बघता यावा, यासाठी जिल्हा वकील संघाच्या वतीने १४ मे रोजी कोर्ट परिसरात मोठा स्क्रिन लावून या सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community