Muslim : मीरा रोडप्रमाणेच मुंबईतील परळ, सांताक्रूझमध्येही धर्मांध मुसलमानांचा दंगल घडवण्याचा होता कट

मीरा रोड येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईतील काही भागात उमटले.

1044
Muslim वस्त्यांमध्ये अफवांचे मेसेज व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
Muslim वस्त्यांमध्ये अफवांचे मेसेज व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला संपन्न झाला. मात्र त्यामुळे मुंबई आणि महानगरात धर्मांध मुसलमानांकडून (Muslim)  या अनुषंगाने तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मीरा रोड येथील नया नगर येथे रामभक्त हिंदूंनी शोभायात्रेचे आयोजन केले होते. त्यावेळी तेथील मुसलमानांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेवर हल्ला केला. त्याचा वेळी मुंबईतील काही भागातही अशाच प्रकारे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न धर्मांध मुसलमानांनी (Muslim) केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्यामध्ये दखल घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली.
मीरा रोड येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईतील काही भागात उमटले. परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड या ठिकाणी असलेल्या सिध्दी अहमद को ऑप हौ. सोसायटी येथे तरूण मित्र मंडळाच्या वतीने इमारतीला भगव्या रंगाचे ज्यावर प्रभु श्रीरामाचा फोटो व जय श्रीराम असे लिहिलेले झेंडे लावणे व लाडु वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या इमारतीला लावण्यात आलेले भगवे झेंडे इमारतीत राहणारे मुफिज रईस अहमद आणि अन्य दोन जणांनी काढून दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढविणे आणि एकोपा टिकवण्यास बाधक अशी कृती केल्याची तक्रार भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

सांताक्रूझमध्ये मुसलमानाची धमकी 

दरम्यान सांताक्रूझ पूर्व गोळीबार नगर या ठिकाणी सोमवारी पिंपळेश्वर महादेव मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी सउद मोहम्मद कुरेशी हा त्या ठिकाणी सिगारेट ओढून धूर मंदिरावर सोडत होता, त्याला असे करण्यास नकार दिल्याने त्याने धमकी देवून ‘मीरा रोड मे जैसे भगवे झेंडे गायब हुए वैसे तुमको गायब कर दुगा’, अशी धमकी दिली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्याचे सउद मोहम्मद कुरेशी याच्याविरुद्ध धमकी देणे, धार्मिक भावना भडकवणे, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी वेळीच दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.