Jumbo Block : रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक…

सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर धावतील.

165
Jumbo Block : रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक...
Jumbo Block : रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक...

पश्चिम रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवार, 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 ते 15.00 वाजेपर्यंत सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर पाच तासांचा जंबो ब्लॉक (Jumbo Block) घेणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत, सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर धावतील.

(हेही वाचा – Tablighi Ijtema : उद्यापासून ओडिशामध्ये होणार तबलिगी इज्तेमा; उत्तराखंडच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क)

ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. याशिवाय अंधेरी आणि बोरिवलीच्या (Andheri, Borivali) काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. या ब्लॉकची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.