Maharashtra State Hindi Sahitya Academy : पत्रकारितेबद्दलची नकारात्मकता संपवायची असेल तर शिक्षण क्षेत्रातील डाव्यांचा प्रभाव संपवावा लागेल – स्वप्नील सावरकर

शोध पत्रकारितेबद्दल बोलताना स्वप्नील सावरकर यांनी डाव्या पक्षांनी अभ्यासक्रमात केवळ परदेशी पत्रकारांना कसे सामावून घेतले आणि भारतीय पत्रकारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष कसे केले याकडे लक्ष वेधले.

184
Maharashtra State Hindi Sahitya Academy: वीर सावरकर यांच्या पत्रकारितेतून शिकण्याची गरज : स्वप्नील सावरकर
Maharashtra State Hindi Sahitya Academy: वीर सावरकर यांच्या पत्रकारितेतून शिकण्याची गरज : स्वप्नील सावरकर

पत्रकारितेचा आद्यगुरू नारदमुनी. नारदमुनी म्हटले कि आपल्या डोक्यात प्रथम नकारात्मक प्रतिमा येते. कारण डाव्यांनी आपल्याला तसे शिकवले आहे. आणि जे शिकवले गेले आहे तेच तेच पुढच्या पिढीपर्यंत जात आहे, त्यामुळे आपल्याला आता पत्रकारितेतील संदर्भ बदलण्याची गरज बनली आहे, पत्रकारितेचा नव्याने अभ्यासक्रम निर्माण केला पाहिजे, पत्रकारितेबद्दलची ही नकारात्मकता संपवायची असेल, तर शिक्षण क्षेत्रातील डाव्यांचा प्रभाव संपवावा लागेल, असे परखड मत ‘हिंदुस्थान पोस्ट’ चे संपादक स्वप्नील सावरकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी (Maharashtra State Hindi Sahitya Academy) आणि के.सी. महाविद्यालयाचा हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यामानाने मुंबईतील ओल्ड कस्टम हाऊस डी.डी. इमारतीत ‘पत्रकारितेतील सांस्कृतिक संदर्भ’ या विषयासंदर्भात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुसऱ्या सत्रात उपस्थित  विद्यार्थ्यांना ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांनी मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विमल मिश्रा होते. शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान तीन सत्रांमध्ये चर्चा झाली.

(हेही वाचा : Muslim : मुसलमानांचा देश मलेशियातच १६ शरिया कायदे झाले रद्द)

सकाळी १० वाजता पहिल्या सत्राला सुरुवात झाली. त्यावेळी माजी मंत्री अमरजीत मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी के.जे. सोमैया विद्यापीठाचे माजी प्राचार्य सतीश पांडे होते. नवभारत टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार सचिंद्र त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे होते. ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार राकेश त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे, ज्येष्ठ पत्रकार सुनील कुमार सिंग, युनूस खान उपस्थित होते. त्यांनी यावेळी पत्रकारितेसंदर्भातील आपले विचार या सत्रात व्यक्त केले.

वीर सावरकरांच्या पत्रकारितेतून शिकण्याची गरज

विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनात त्यांनी पत्रकारितेचा संदर्भ बदलण्याच्या गरजेवर भर दिला. डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी भारतीय इतिहासात केलेल्या गैरसमजाबाबत त्यांनी भाष्य केले. डाव्या विचारांच्या लोकांनी नारद मुनीच्या प्रतिमेला नकारात्मक रंग कसा दिला हेही स्वप्नील सावरकर यांनी सांगितले. शोध पत्रकारितेबद्दल बोलताना त्यांनी, डाव्या पक्षांनी अभ्यासक्रमात केवळ परदेशी पत्रकारांना कसे सामावून घेतले आणि भारतीय पत्रकारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष कसे केले याकडे लक्ष वेधले. यासाठी त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरां’च्या पत्रकारितेचे उदाहरण दिले. या मुद्द्याअंतर्गत त्यांनी महान स्वातंत्र्यसैनिक मदनलाल धिंग्रा यांच्यावर कट रचण्याचा एक भाग म्हणून ब्रिटिश पोलिसांनी त्यांची दया याचिका नोंदीतून कशी काढून टाकली. ती दया याचिका प्रकाशित करून वीर सावरकरांनी पोलिसांचा पर्दाफाश कसा केला? याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत माहितीदेखील स्वप्नील सावरकर यांनी दिली. एमएमपी शाह महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या माजी प्रमुख उषा मिश्रा, बिर्ला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक श्यामसुंदर पांडे आणि ज्येष्ठ चित्रपट पत्रकार पराग चापेकर यांनीही या सत्राला संबोधित केले.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या कार्यकारी अध्यक्ष शीतल दुबे, के. जे. सोमय्या विद्यापीठाचे माजी प्राचार्य सतीश पांडे, के. जे. सोमय्या विद्यापीठाचे उपप्राचार्य समरजित पाधी आदी यावेळी उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.