Jharkhand : ‘मी माझ्या मुलांना काय सांगू?’, दक्षिण आफ्रिकेतील नायजरमध्ये भारतीय कामगारांचं अपहरण

झारखंडच्या(Jharkhand) गिरिडीह जिल्ह्यातील ५ भारतीय कामगार दक्षिण आफ्रिकेत कामानिमित्त गेले असता नायजर येथील सशस्त्र लोकांनी त्यांचं अपहरण केले.

45

झारखंडच्या(Jharkhand) गिरिडीह जिल्ह्यातील ५ भारतीय कामगार दक्षिण आफ्रिकेत कामानिमित्त गेले असता नायजर येथील सशस्त्र लोकांनी त्यांचं अपहरण केले. झारखंड(Jharkhand)मधील ५ जणांचे अपहरण केले असून त्यांच्या कुटुंबियांनी सरकारकडे मदतीची याचना केली आहे. सर्व स्थलांतरित कामगार वीज पारेषण व वितरण, शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणारी कंपनी कल्पतरू इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत.

(हेही वाचा Maharashtra HSC Result 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, निकालाची तारीख झाली जाहीर, तुम्ही येथे पाहू शकता निकाल )

या कामगारांमधील एका व्यक्तीने सांगितले की, लोकं जेवण संपवून कामावर परतण्याच्या बेतात असतानाच त्यांना गोळीबाराचा आवाज आला. दि. २५ एप्रिल रोजी नायजरमधील तिलाबेरी प्रदेशात बंदुकधाऱ्यांनी पाच कामगारांचं अपहरण केले. इतर अपहरण केलेल्या कामगारांमध्ये राजू महतो, चंद्रिका महतो, फलजीत महतो आणि उत्तम महतो यांचा समावेश आहे. अपहरण झालेल्यांमध्ये नायजरचा नागरिक आदम देखील आहे.

ते पुढे म्हणाले, आम्ही कंपनीच्या बसमध्ये आश्रय घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ती बस वाळूमध्ये अडकली. सुमारे ७०-८० मोटारसायकली आमच्या मागे येत होत्या. ते सर्व बंदुका घेऊन होते. मोजिलाल, जो आता कंपनीच्या कॅम्पमध्ये आहे आणि घरी सुरक्षित मार्गाची वाट पाहत आहे, असे सदर व्यक्तीने वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, झारखंडमधील ५ जणांचे अपहरण केले असून त्यांच्या कुटुंबियांना व्यक्ती घरी परतण्याची वाट पाहत आहेत.(Jharkhand)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.