Muslim : बुरखा घालून रुग्णालयात वावरत होता जावेद पकडला गेला; तेव्हा म्हणाला, मी समलैंगिक….

जावेदचे वय ३२ वर्षे असून तो व्यवसायाने कॉम्प्युटर मेकॅनिक असून २०व्या दिवसापासून बुरखा घालून रुग्णालयात येऊ लागला.

142

महाराष्ट्रातील नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या परिसरात एक तरुण गेल्या २० दिवसांपासून बुरखा परिधान करुन रुग्णांना भेटत असल्याची घटना घडली आहे. अलीकडे त्याचे हे कृत्य पाहून सुरक्षा रक्षकाला संशय आल्यानंतर त्याला एकट्यात गाठून चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. जावेद असे या तरुणाचे नाव असून तो समलैंगिक आहे, पुरुष रुग्णांशी मैत्री करण्यासाठी तो रुग्णालयात येत असे. पुरुष रुग्णांना आपल्या जाळ्यात सहज अडकविता यावे म्हणून तो बुरखा घालून महिला डॉक्टर आहे असे भासवायचा.

जावेदचे वय ३२ वर्षे असून तो व्यवसायाने कॉम्प्युटर मेकॅनिक असून २०व्या दिवसापासून बुरखा घालून रुग्णालयात येऊ लागला. तो बुरख्यावर पांढऱ्या रंगाचे एॅप्रन घालून पुरुष रुग्णांकडे जाऊन त्यांच्याशी बोलत असे, त्यांचे नंबर घेत असे. महिलेचा हुबेहूब आवाज काढत असल्यामुळे कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही, पण ऐके दिवशी रुग्णालयाचा सुरक्षा रक्षक संतोषीने त्याला रंगेहात पकडले. चौकशीदरम्यान त्याने त्याचे नाव आयशा सिद्धिकी असे सांगितले. मात्र सुरक्षा रक्षकाचा संशय अधिक गडद झाल्याने त्याला बुरखा काढण्यास सांगितले. जावेदने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पुरुषांसमोर बुरखा उतरवता येत नाही, असेही तो म्हणाला. यावर संतोषीने त्याला बाजूला घेतल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरक्षा रक्षकाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर जावेद ‘मला वाचवा, मला वाचवा’ अशा विनवण्या करु लागला.

(हेही वाचा Veer Savarkar : कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा हिंदुद्वेष; सत्तेत येताच वीर सावरकरांवरील धडा अभ्यासक्रमातून वगळला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.