पेंग्विनसाठी करोडो रुपये…हत्ती मात्र दुर्लक्षित!

98

गडचिरोलीच्या दुर्गम भागात काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीने राज्याच्या वन आणि पर्यंटन मंत्र्यांचा निषेध करत आंदोलन केले. जिल्ह्यातील कमलापूरच्या जंगलात जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.

भारतात पेंग्विनचा नैसर्गिक अधिवास नसताना मुंबईतील राणीच्या बागेत करोडो रुपये खर्च करून पेंग्विन पोसले जातात. तर कमलापूर येथील हत्तींकडे कानाडोळा का केला जातो? कमलापूर हत्ती कॅम्प पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम व सोयीस्कर आहे. नक्षल्याचे माहेर घर मानले जाणाऱ्या कमलापूर येथे मोठ्या संख्येने पर्यटक हत्ती कॅम्प बघायला येतात. काही वर्षांपूर्वी कमलापूर हत्ती कॅम्पवर नक्षल्यांनी हल्ला करत कॅम्पची नासधूस केली व तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती. परंतु आता कमलापूरला वेगळे प्रारूप मिळाले असून पर्यटक न घाबरता कमलापूरात पोहचतात कॅम्पच्या नजीकच गाव असल्यामुळे खाण्या-पिण्याची दुकाने आणि पर्यायाने रोजगार वाढला आहे. गावातील लोकांच्या मनातील नक्षल्याबद्दलची भीती कमी झाली आहे. गावात वर्दळ वाढली हा गावाचा नाहीतर देशाचा विजय आहे युद्ध न करता हत्तीमार्फत ही नक्षल्यांना मिळालेली मात असल्याचे दत्ता शिर्के यांनी सांगितले.

(हेही वाचा सोमय्या दिसले मंत्रालयात कर्मचा-याच्या खुर्चीत! काय म्हणाले सत्ताधारी आणि विरोधक?)

कमलापूरला हत्तींमुळे वेगळ वळण

एकीकडे नक्षलवादी विकासाच्या विरोधात बंड पुकारून सरकारी वाहनाची नासधूस करतात विकास होण्यास अवरुद्ध निर्माण करत धमक्या दिल्या जातात. शहरातील लोकांनी गावात येऊ नये म्हणून स्वतःची वेगळी दहशत निर्माण प्रस्थापित करतात परंतु कमलापूरला आता हत्तींमुळे वेगळ वळण मिळाले आहे. एक गाव नक्षल्यांची भीती झूंगारून जर विकासाकडे वाढते आहे तर मग प्रतिनिधित्व करणारा नेता त्यांना पाठिंबा का देत नाही असा सवाल शिर्के यांनी उपस्थित केला आहे.

जनसंघर्ष समितीचा इशारा

ओडिसातून आलेल्या हत्तींनी केलेली नासधूस यांना दिसली पण नासधूसीमुळे होणारी नुकसान भरपाई यांना दिसली नाही. तेव्हा गावातील लोकांचे अश्रू पुसण्यास कुठलाच पदाधिकारी का आला नाही सध्या कमलापूर लोकांसाठी चर्चेचा विषय झाला आहे. जो पर्यंत कमलापूर व पातानील हत्तीचा बदलीचा अहवाल थंड बस्त्यात बंद होत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचा इशारा जनसंघर्ष समितीच्या वतीने राज्य सरकारला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.