BMC Sports Complex च्या पुनर्विकासास जनता दलाचा आक्षेप

30
BMC Sports Complex च्या पुनर्विकासास जनता दलाचा आक्षेप
  • प्रतिनिधी

बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरील क्रीडाभवन जिमखान्याच्या जागेवर काचेचा घुमट असलेला टाऊन हॉल, व्ह्युइंग गॅलरी आणि कॅफेटेरिया उभारण्याच्या निर्णयाला जनता दल (सेक्युलर) मुंबई आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याला ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असे संबोधत त्यांनी या जागेवर क्रीडाभवनच कायम ठेवण्याची मागणी केली आहे. (BMC Sports Complex)

१९२६ मध्ये महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडून मिळवलेल्या या जागेवर क्रीडा संकुल उभारले. पुढील वर्षी याला १०० वर्षे पूर्ण होत असताना, महापालिका प्रशासन जिमखाना बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रभाकर नारकर, सलीम भाटी, प्रशांत गायकवाड, जगदिश नलावडे, दिनेश राणे आणि संग्राम पेटकर यांनी केला. (BMC Sports Complex)

(हेही वाचा – PSL vs IPL : रमीझ राजांनी जेव्हा पीएसएलचा जाहीर उल्लेख आयपीएल असा केला…)

क्रीडाभवन हा स्वतंत्र उपक्रम असून, याचे १०,००० सभासद, २,५०० आजीव सभासद आणि कोट्यवधींचा अर्थसंकल्प आहे. येथे कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल यासह विविध खेळांच्या सुविधा ३१ ठिकाणी उपलब्ध आहेत. खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. (BMC Sports Complex)

२०१० मध्ये आर्थिक गैरव्यवहारामुळे कार्यकारिणी बरखास्त झाली. त्यानंतर निवडणुका न घेता किरण दिघावकर यांनी कारभार ठेवला. अश्विनी भिडे यांनी निवडणुकीचे आदेश दिले, पण अंमलबजावणी झाली नाही. आता कार्यकारिणीअभावी पुनर्विकासाचा निर्णय घेतला जात आहे. जनता दल आणि मासने आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून तातडीने निवडणुका घेऊन कार्यकारिणी स्थापन करावी आणि जिमखान्याची वास्तू कायम ठेवावी, अशी मागणी केली आहे. (BMC Sports Complex)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.