जम्मू काश्मीरमधील (Jammu-Srinagar) रामबन जिल्ह्यात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे परिसरात प्रचंड हाहाकार माजला आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही रामबन परिसरात बचावकार्य सुरू होते. घरे आणि रस्त्यांवरून ढिगारा काढण्याचे काम सुरू होते. तथापि जम्मू-श्रीनगर महामार्ग (Jammu-Srinagar Highway, NH-44) सलग दुसऱ्या दिवशीही बंद राहिल्यामुळे शेकडो ट्रक आणि वाहने वेगवेगळ्या ठिकाणी अडकली आहेत. अडकलेल्यांमध्ये शेकडो पर्यटकांचाही समावेश आहे. (Jammu and Kashmir cloudburst)
(हेही वाचा – Dr. Ghaisas Case : आयएमए, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा)
खराब हवामान परिस्थिती आणि अचानक आलेल्या पुराचा धोका लक्षात घेता, रामबन जिह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाने लोकांना प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक आमदार अर्जुन सिंह राजू (Arjun Singh Raju) यांनी या घटनेचा आढावा घेत ‘आम्ही अशी दुर्घटना यापूर्वी कधीच पाहिली नाही’ असे माध्यमांसमोर स्पष्ट केले. या दुर्घटनेत मालमत्तेचे जे काही नुकसान झाले ते अपरिहार्य आहे, परंतु जीवितहानी ही अत्यंत दुर्दैवी आहे. तथापि, परिस्थिती आता हळूहळू सामान्य होत आहे. लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि बंद रस्ते पुन्हा सुरू करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.
गुजरातमधील पर्यटकांची बस अडकली
गुजरातहून 50 प्रवाशांना घेऊन जाणारी एक बसही खराब हवामानामुळे तिथे अडकली होती. या बसमध्ये गांधीनगरमधील 30 आणि पालनपूरमधील 20 प्रवासी होते. सर्व प्रवासी श्रीनगरला परतत आहेत. एका गुजराती प्रवाशाने 20 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:35 वाजता एक व्हिडिओ व्हायरल करत गुजरात सरकारला मदतीचे आवाहन केले होते. यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. संपूर्ण रात्र बसमध्ये घालवल्यानंतर सोमवारी सकाळी सर्व प्रवाशांना रामबन आर्मी कॅम्पमध्ये आणण्यात आले. तेथून ते पुढे श्रीनगरला परतले आहेत. (Jammu and Kashmir cloudburst)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community