Jammu Kashmir : सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

117
Jammu Kashmir : सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुपवाडा येथे भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचा कट उधळून लावत पाच दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. कुपवाडामधील एलओसीच्या जुमागुंडा भागात भारतीय लष्कर आणि दहशदवादी यांच्यात चकमक सुरु आहे. सुरक्षा दलाने या भागात सर्च ऑपरेशन सुरु केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली.

भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाच दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत त्यांना कंठस्नान घातलं आहे. या महिन्यातील काश्मीर खोऱ्यात घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न होता.

(हेही वाचा – Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाचे तांडव; २३ जण जखमी, १ हजार गावांचा वीजपुरवठा खंडीत)

भारतीय लष्कराला मोठं यश

भारतीय सैन्य दल आणि जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांनी शुक्रवारी १६जून रोजी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला. कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LOC) भारतीय सैन्य दलाने पाच दहशतवाद्यांना ठार केलं. हे दहशतवादी रात्रीच्या वेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यावर कारवाई करण्यात सैन्य दलाला यश मिळालं आहे.

पाच दहशतवाद्याचा खात्मा

सैन्य दलाला उत्तर काश्मीर (Jammu Kashmir) जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील जुमागुंड भागातील दहशतवाद्यांच्या कटाबाबत सुत्रांकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दहशतवाद्यांना ठार केलं. नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांनी ऑपरेशन सुरू केल्यानंतर शुक्रवारी सकाळी चकमक सुरू झाली. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), विजय कुमार यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती देत सांगितलं आहे की,”चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले. परिसरात शोध सुरू आहे.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.