-
प्रतिनिधी
विलेपार्ले (पूर्व) येथील जैन समाजाच्या श्रद्धास्थळी तात्पुरत्या शेडच्या उभारणीला अखेर न्यायालयाने परवानगी दिली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता व धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मिळालेली ही परवानगी जैन समाजासाठी मोठा दिलासा ठरली आहे. ‘ही केवळ शेड नाही, तर श्रद्धेच्या संघर्षाचा न्यायालयीन विजय आहे’, असे म्हणत समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. (Jain Temple)
तणावाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक निकाल
काही दिवसांपूर्वी विलेपार्ले पूर्वमधील जैन मंदिर हटवण्यात आले होते, ज्यामुळे जैन समाजात नाराजीचं वातावरण पसरलं होतं. मात्र शांततापूर्ण मार्गाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावत त्यांनी आपली बाजू मांडली. त्याला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हा निर्णय धार्मिक श्रद्धा आणि कायदा यांचा समतोल साधणारा ठरला आहे. (Jain Temple)
(हेही वाचा – Haryana च्या ‘या’ प्रसिद्ध महिला युट्यूबरला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक; पाकसाठी हेरगिरी केल्याचा आरोप)
BMC च्या यंत्रणांनी घेतली तत्परता
या आदेशानंतर BMC च्या K/ईस्ट विभागाने तातडीने शेड उभारणीचे काम सुरू केले आहे. पावसाळ्यात श्रद्धास्थळाचे संरक्षण व भाविकांची सोय लक्षात घेता ही शेड उभारण्यात येत आहे. या उपक्रमामुळे धार्मिक कार्यक्रम विनाअडथळा सुरू ठेवता येणार आहेत. (Jain Temple)
मंगल प्रभात लोढा यांचा निर्णायक पुढाकार
राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा निर्णय शक्य झाला आहे. “हा फक्त धार्मिक श्रद्धेचा विषय नाही, तर जनआस्थेच्या विजयाची खूण आहे. आम्ही जैन बांधवांच्या भावनांना मान देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. आजचा हा निर्णय त्यांच्या श्रद्धेला आधार देणारा आहे,” असे लोढा यांनी सांगितले. (Jain Temple)
(हेही वाचा – ‘Operation Sindoor’वर भारताची भूमिका मांडणार ‘हे’ सात खासदार; विदेशात कोण-कोण शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार)
समाजात समाधान, श्रद्धा आणि न्याय यांचा आदर्श समतोल
या निर्णयामुळे विलेपार्ले पूर्वमधील जैन समाज व स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शांततेने आणि कायदेशीर मार्गाने लढून श्रद्धेचा हा विजय मिळवणं हे लोकशाहीचं खरे सौंदर्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. (Jain Temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community