J J hospital : जे. जे. रुग्णालयाच्या अंतर्गत राजकारणात रुग्णांची होतेय हेळसांड

नोटीसला उत्तर देण्याआधीच चौकशी समिती बनवण्यात आली आणि चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ अशोक आनंद यांना करण्यात आले आहे.

99
J J hospital : जे - जे रुग्णालयाच्या अंतर्गत राजकारणात रुग्णांची होतेय हेळसांड

दीपक कैतके

सर जे. जे. रुग्णालयातील (J J hospital) नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ अध्यापकांनी बुधवारी (३१ मे) राजीनामा दिला. राजीनामा दिलेल्यांमध्ये माजी विभागप्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांचाही सहभाग आहे. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे आणि गेल्या वर्षभरात रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी केलेल्या छळामुळे राजीनामा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

नेत्र विभागात पदव्युत्तर शाखेच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या २८ निवासी डॉक्टरांनी (J J hospital) आपल्याला शस्त्रक्रिया करू दिल्या जात नाहीत तसेच आपल्याला अशलाघ्य भाषेत बोलून अपमानकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप मार्डच्या माध्यमातून अधिष्ठातांकडे केला हाेता. या तक्रारीवरून अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी नोटीस देत विचारणा केली. नोटीसला उत्तर देण्याआधीच चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक आनंद यांना करण्यात आले आहे. मात्र विशाखा समितीचे अध्यक्ष असताना डॉ. रागिणी पारेख यांनी एका प्रकरणात डॉ. अशोक आनंद यांची चौकशी केली होती. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. तसेच डॉ अशोक आनंद यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्यासहित ४ वरिष्ठ डॉक्टरांविरूद्ध अॅक्ट्रोसिटीची तक्रार देखील केली होती. यामुळे डॉ. अशोक आनंद यांची चौकशी समितीवरील नियुक्ती ही पक्षपाती असल्याचे बोलले जात आहे. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि डॉ. लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यातील या शीतयुद्धामुळे नेत्रविभागात येणाऱ्या रुग्णांचे मात्र सध्या हाल होत आहेत.

(हेही वाचा – J J Hospital : डॉ. लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांनी दिले तडकाफडकी राजीनामे…)

काय आहे अंतर्गत राजकारण 

वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने (J J hospital)असतांना कोविडच्या काळात डॉ. पल्लवी सापळे यांची बदली मिरज येथे आणि नंतर धुळे येथील मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आली होती. याचाच राग डोक्यात ठेवून निवृत्ती नंतर डॉ. लहाने आणि त्यांच्या निकटवर्तीय असल्याने डॉ. रागिणी पारेख यांना गेली एक ते दीड वर्षांपासून त्रास दिला जात असल्याचे बोलले जात आहे. परंतु यात नाहक भरडला जात आहे तो सामान्य रुग्ण ज्याचे या राजकारणाशी काहीच घेणे देणे नाही. नेत्र विभागाला कुठल्याच प्रकारचे सहकार्य करायचे नाही, तसेच राज्यभर घेतल्या जाणाऱ्या कॅम्पमध्ये आडकाठी देखील केली जाते याबद्दल दबक्या आवाजात आधीपासून बोलले जात होते.

काही दिवसांपूर्वी नेत्र विभागात पदव्युत्तर शाखेच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या (J J hospital)२८ निवासी डॉक्टरांनी डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने त्रास देत असल्याची तक्रार राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री, सचिव, संचालक आणि जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता समिती नेमण्यात आली आहे.

हेही पहा – 

या समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक आनंद यांना करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिणी पारेख यांनी चौकशी केली होती. तसेच डॉ. आनंद यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्या विरोधात ॲट्रोसिटीची पोलिस तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या अशा व्यक्तीकडून चौकशी करण्याऐवजी समितीचा अध्यक्ष बदलावा, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, अधिष्ठात्यांनी तसे न करता चौकशी सुरू ठेवली. यामुळे आकसबुद्धीने ही चौकशी करत असल्याचे अध्यापकांतर्फे सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षभरात अधिष्ठात्यांनी या विभागासाठी कोणतीही मदत केलेली नाही, असा आरोपही करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.