Hotel मध्ये शाकाहारी-मांसाहारी पदार्थ स्वतंत्र शिजवणे बंधनकारक; अन्यथा…

95
Hotel मध्ये शाकाहारी-मांसाहारी पदार्थ स्वतंत्र शिजवणे बंधनकारक; अन्यथा...
  • प्रतिनिधी

हाॅटेल, (Hotel) रेस्टॉरंटमध्ये यापुढे शाकाहारी मांसाहारी पदार्थांची संपूर्ण प्रक्रिया वेगळी असणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार पदार्थावर प्रक्रिया, शिजवणे वेगवेगळ्या पद्धतीत करावे, अन्यथा व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिला आहे.

शाकाहारी अन्नपदार्थाची मांसाहारी अन्न पदार्थापासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिला आहे. सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षेबाबत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर यावर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापनाना त्वरित नोटीस, कारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Hotel)

(हेही वाचा – Shani Shingnapur Devasthan : महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराजांकडून देवस्थानाच्या निर्णयाचं स्वागत)

१८९ अन्न सुरक्षा अधिकारी नियुक्त!

अन्न व औषध प्रशासनात एकूण नवीन १८९ अन्न सुरक्षा अधिकारी ७ जून २०२५ रोजी रुजू झालेले असल्याने अन्न आस्थापना तपासणी संख्या निश्चितच वाढणार आहे. राज्यभरातील हॉटेल्स (Hotel), रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या केल्या जात असून तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

…तर येथे तक्रार करा!

अन्न भेसळीसंदर्भात नागरिकांनीही हेल्पलाइन किंवा फूड सेफ्टी काॅटेक्ट अॅप च्या माध्यमातून तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपले नजीकचे अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा https://fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.