BMC : शासन आदेश जारी; वृक्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच होणार झाडांची कत्तल आणि फांद्यांची छाटणी

राज्य शासनाच्या निर्णयामध्ये स्थानिक वृक्ष प्राधिकरणामार्फत या अधिकारांचा वापर करताना व या संदर्भातील निर्णय घेताना, त्यांना योग्य तांत्रिक सल्ला मिळावा म्हणून वृक्ष तज्ञांची नियुक्ती करण्याची तरतूद अधिनियमात आहे. राज्यातील नागरी भागातील वृक्षांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ अस्तित्वात आहे.

1207
BMC : मुंबई महापालिका आणखी २५०० संगणकांची करणार खरेदी

मुंबईत पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या धोकादायक झाडांसह झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्यासाठी महापालिकेच्यावतीने (BMC) कंपन्यांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, झाडांच्या फांद्यांची ही छाटणी शास्त्रोक्त केली जात नसून बऱ्याचदा वाहने पुरवणाऱ्या संस्थांसह गाळ उचलणाऱ्या संस्थांची नेमणूक केली जाते. त्यामुळे झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचे काम शास्त्रोक्तपणे व्हावे यासाठी वृक्ष तज्ञांचा समावेश असलेल्या कंपन्यांची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी वृक्ष तज्ञ असलेल्या तीन कंपन्यांची यादीच शासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबईत या शासन निर्णयानुसार झाडांच्या फांद्याची छाटणी ही या तज्ज्ञ कंपनीच्या मार्गदर्शनाखालीच करणे बंधनकारक ठरणार आहे. (BMC)

राज्य शासनाच्या निर्णयामध्ये स्थानिक वृक्ष प्राधिकरणामार्फत या अधिकारांचा वापर करताना व या संदर्भातील निर्णय घेताना, त्यांना योग्य तांत्रिक सल्ला मिळावा म्हणून वृक्ष तज्ञांची नियुक्ती करण्याची तरतूद अधिनियमात आहे. राज्यातील नागरी भागातील वृक्षांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ अस्तित्वात आहे. या अधिनियमानुसार स्थानिक वृक्ष प्राधिकरणास त्यांच्या नागरी क्षेत्रामधील वृक्षांची लागवड (रोपण), जतन, संरक्षण व तोडण्या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे नमुद केले आहे. (BMC)

अधिनियमातील या तरतुदीनुसार जबाबदारी पार पाडण्यासाठी स्थानिक वृक्ष प्राधिकरणास योग्य तांत्रिक सल्ला मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक वृक्ष प्राधिकरणाला या विषयातील योग्य अनुभव व तांत्रिक क्षमता असलेल्या तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या कंपन्यांचा सल्ला घेता यावा यासाठी या विभागाने ३ कंपन्याचे नामनिर्देशन (Empanelment) केले आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने हा शासन निर्णय १५ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आला असून या शासन आदेश १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी करण्यात आला आहे. याबाबतचे शासन आदेश सर्व महापालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व नगरपरिषद आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, एमआयडीसीचे सीईओ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव, एमएमआरडीएच आयुक्त, म्हाडाचे उपाध्यक्ष, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आदींना जारी करण्यात आले आहे. या नामनिर्देशित कंपन्यांकडून निविदा मागवून यामधील सर्वात कमी किंमतीची निविदा असणाऱ्या (एल वन) कंपनीकडून वृक्षांची लागवड (रोपण), जतन व संरक्षण विषयातील तांत्रिक सल्ला व इतर कामे करून घेण्यास स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांना तथा स्थानिक वृक्ष प्राधिकरणाला तसेच इतर प्राधिकरणाला मुभा राहील, असे या शासन निर्णयामध्ये नमुद केले आहे. (BMC)

(हेही वाचा – Punyeshwar Temple उभारणीचा सुनील देवधर यांचा निर्धार)

बेसुमार वृक्ष तोडीमुळे वातावरणावर होणारे गंभीर परिणाम आटोक्यात आणण्यासाठी वृक्षांची लागवड तसेच त्यांचे संवर्धन करण्याच्या विविध योजना शासनामार्फत राबवण्यात येतात. सध्याच्या वृक्ष नियमावलीची अंमलबजावणी यशस्वी केल्यास वातावरणीय बदलातील तापमान वाढ रोखण्यास मदत होईल. त्यामुळे प्रकल्पांमध्ये झाडे कापण्यास परवानगी देताना तसेच पावसाळ्यापूर्वी मृत झाडांची कत्तल करणे, शिवाय झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्यासाठी या तज्ज्ञ कंपनीची नियुक्ती करणे या शासन निर्णयानुसार बंधनकारक केले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आगामी काळात झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना तसेच अनेक प्रकल्पांमध्ये झाडे कापण्यास परवसानगी देताना या वृक्ष तज्ञांचा समावेश असलेल्या या तिन पैंकी एका कंपनीची मदत घ्यावी लागणार आहे. (BMC)

मुंबई महापालिकेमध्ये (BMC) मागील काही वर्षांपूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी शास्त्रोक्तपणे करण्यासाठी वृक्ष तज्ञांची मदत घेण्याची मागणी वाढली होती. परंतु त्यानंतर महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु आता शासनाने अशाप्रकारचा निर्णय घेऊन वृक्ष तज्ञ असलेल्या तीन कंपन्यांची यादीच जाहीर केल्याने महापालिका प्रशासनाला (Municipal Administration)  आता या कंपन्यांच्या मार्गदर्शनाखालीच फांद्यांची छाटणीसह बाधित होणाऱ्या झाडांची कत्तल तसेच पुनर्रोपण करणे भाग पडणार आहे. (BMC)

वृक्ष तज्ञ म्हणून नेमणूक केलेल्या कंपन्यांच्या नावांची यादी
  • ऑसकॉर्प इन्फ्रा सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Oscorp Infra Solution Private Limited)
  • एस. के. एंटरप्रायझेस (सुरज सामंत एचयुएफ) (S.K.Enterprise (Suraj Sarnat HUF)
  • एन. के. शहा इंन्फ्राप्रोजेक्ट (N.K.Shah infraprojects) (BMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.