Isro: ८२४ किमी उंचीवरून इस्रोने काढले भारताचे छायाचित्र; भौगोलिक स्थानांविषयी दिली ‘ही’ वैशिष्ट्यपूर्ण माहिती

70
Isro: ८२४ किमी उंचीवरून इस्रोने काढले भारताचे छायाचित्र; भौगोलिक स्थानांविषयी दिली 'ही' वैशिष्ट्यपूर्ण माहिती
Isro: ८२४ किमी उंचीवरून इस्रोने काढले भारताचे छायाचित्र; भौगोलिक स्थानांविषयी दिली 'ही' वैशिष्ट्यपूर्ण माहिती

दिवाळीच्या आधी ७ ते ८ नोव्हेंबर रोजी ८२४ किमी उंचीवरून रात्रीच्या वेळी काढलेली भारताची छायाचित्रे हैदराबाद येथील इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने (NRSC) विशेष प्रक्रिया करून काढली आहेत. प्रकाशाच्या धाग्यात बांधलेले हे छायाचित्र ‘एकतेचा संदेश’ देणारे असून धर्म, संप्रदाय आणि भौगोलिक स्थाने वेगवेगळी असली, तरी आपण एक आहोत, हे सांगणारे आहे.

अंतराळातून रात्रीच्या वेळी पृथ्वीचा कोणताही भाग तेथून येणाऱ्या विद्युत प्रकाशावरून ओळखला जाऊ शकतो. जेथे मानवी लोकसंख्या जास्त आहे, तेथे प्रकाशकिरणांची चमक जास्त असते तसेच मनुष्य वस्तीही जास्त असल्याचे दिसून येते, अशी माहिती या नकाशाविषयी इस्रोच्या प्रमुखांनी दिली आहे.

(हेही वाचा – Virat Kohli Baffled : ‘हा’ सोशल व्हायरल ट्रेंड विराटलाही नव्हता माहित)

अंधार आणि प्रकाशाचा अर्थ
दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, अहमदाबाद, जयपूर यासह देशातील प्रमुख शहरे, अनेक लहान शहरे आणि ग्रामीण भाग प्रकाशाने चमकत आहेत. हे या भागातील जास्त लोकसंख्येचे चिन्ह आहे, तर मध्य प्रदेश आणि राजस्थान हे देशातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेल्या राज्यांपैकी आहेत. त्यामध्ये वनक्षेत्र, वाळवंट, डोंगराळ भाग, तलाव आणि नद्या आहेत. त्यामुळे इथे अंधार दिसतो. जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्येकडील प्रदेशातील अतिशय मंद प्रकाश याचा अर्थ म्हणजे येथील अनेक भागात विरळ लोकवस्ती आहे.

पृथ्वीची रात्रीची प्रतिमा
सुओमी नॅशनल ध्रुवीय परिभ्रमण इमेजिंग रेडिओमीटर (VIIRS) उपकरणाद्वारे संपूर्ण पृथ्वीची रात्रीची प्रतिमा दररोज कॅप्चर केली जाते. पृथ्वी प्रणाली विज्ञान, चंद्रप्रकाश, ढग, एरोसोल आणि पर्वतीय बर्फाच्या प्रतिमा यांचा अभ्यास करण्यासाठी या प्रतिमांचा वापर जगभरातील अभ्यासक करतात.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.