Israel hamas conflict : सैन्य अन् हमासमध्ये भीषण संघर्ष; इस्त्रायल सैनिकांना माघारी बोलविणार 

गाझामध्ये अधिक शक्तिशाली आक्रमण करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यापासून गाजामध्ये घुसलेल्या सैनिकांना माघारी बोलविण्यात येणार आहे.

171
Israel hamas conflict : सैन्य अन् हमासमध्ये भीषण संघर्ष; इस्त्रायल सैनिकांना माघारी बोलविणार 

इस्त्रायली सैन्याने गाझामध्ये एकीकडे कारवाई तीव्र केलेली असताना दुसरीकडे मात्र गाझात तैनात सैन्यातील हजारो सैनिकांना माघारी बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. आयडीएफने रविवारी (३१डिसेंबर) यासंदर्भात घोषणा केली आहे. गाझामध्ये लढणाऱ्या पाच ब्रिगेड माघारी बोलविण्यात येणार आहे. हे सैन्य राखीव सैनिकांचे असणार आहे. (Israel hamas conflict)

गाझामध्ये (gaza) अधिक शक्तिशाली आक्रमण करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यापासून गाजामध्ये घुसलेल्या सैनिकांना माघारी बोलविण्यात येणार आहे. हे सैन्य राखीव सैनिकांचे असणार आहे. गाझामध्ये अधिक शक्तिशाली आक्रमण करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून गाजामध्ये घुसलेल्या सैनिकांना माघारी बोलविण्यात येणार आहे. त्यांच्या जागी नवीन राखीव सैनिक पाठविण्यात येणार आहे. यादरम्यान गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासात इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्यात १५० फिलीस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. तसेच २८६ लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे. (Israel hamas conflict)

(हेही वाचा : Billionaire’s Day Out : मुंबईच्या ‘या’ अब्जाधीशाने केला वेळ वाचवण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास )

आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की काही राखीव सैनिक या आठवड्यात लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबात आणि नोकरीवर परततील. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि नवीन वर्षात सुरू होणाऱ्या गोष्टींपूर्वी ताकद एकत्रित करण्यास मदत मिळेल. गाझामधील हमासचे बोगदे नष्ट करण्याचे काम सुरू आहे.गाझामधून इस्रायलच्या दिशेने डागलेल्या रॉकेटची तीव्रता कमी करण्यासाठीही काम केले जात आहे.इस्रायलने मध्य गाझावर हल्ले तीव्र केले आहेत. रात्रभर अल-मगाझी आणि अल-बुरेज सारख्या शहरांवर हवाई हल्ले झाले. रेड क्रिसेंटने रविवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इस्रायली हल्ल्यानंतर अफरातफरीचे वातावरण दिसत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.