गाझाला मदत करणाऱ्या Greta Thunberg वर इस्रायलची मोठी कारवाई; एक्सवर फोटो पोस्ट

136

इस्रायलने (Israel) पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला (Greta Thunberg) तिच्या देशात परत पाठवले आहे. तिला फ्रान्सला जाणाऱ्या विमानाने स्वीडनला परत पाठवण्यात आले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Accident News : जयपूरमध्ये ट्रक आणि जीप यांच्यात भीषण अपघात ! वधू-वरासह ५ जणांचा मृत्यू)

इस्रायलने तो फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ग्रेटाला फ्रान्सला जाणाऱ्या विमानात बसवताना दाखवले आहे. मंगळवार, १० जून २०२५ या दिवशी ही कारवाई करण्यात आली. ग्रेटा थनबर्ग गाझा (Gaza) पट्टीतील लोकांना साहाय्य करण्यासाठी एका बोटीतून पोहोचली होती. त्यानंतर तिला ९जून २०२५ रोजी इस्रायली सुरक्षा दलांनी अटक केली होती.

थनबर्ग ‘मॅडलिन’ (Madeline) नावाच्या जहाजावरील १२ प्रवाशांपैकी एक होती. इस्रायलने तिचे जहाजही जप्त केले होते. ‘फ्रीडम फ्लोटिला कोलिशन’ या संघटनेने हा दौरा आयोजित केला होता. इस्रायलच्या नौदलाने गाझापासून सुमारे २०० किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात हे जहाज जप्त केले, असे संघटनेने सांगितले. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप या संघटनेसह अन्य संघटनांनी केला.

इस्रायलने मात्र हे आरोप फेटाळले. ‘अशी जहाजे गाझाच्या कायदेशीर नौदल नाकाबंदीचे उल्लंघन करतात,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. इस्रायली नौदलासोबत हे जहाज सोमवारी सायंकाळी अशदोद बंदर येथे आणण्यात आले, असे देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. (Greta Thunberg)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.