इस्रायली (Israel) सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी हुथी बंडखोरांना (Houthi Rebels) लक्ष्य केले. येमेनच्या आतंकवादाच्या विरोधात हवाई हल्ले करून इस्रायलने येमेनची राजधानी सना येथील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ (Sanaa International Airport) बंद पाडले आहे.
इस्रायली लष्कराने सांगितले की, त्यांनी इराण समर्थित हुथी बंडखोरांवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर येमेनची (Yemen) राजधानी सनाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. यासोबतच वीज प्रकल्पांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. लष्कराने सलग दुसऱ्या दिवशी हुथी बंडखोरांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
(हेही वाचा – मुसलमानांवरील हल्ल्याचा बदला घेऊ; Al Qaeda ची हिंदूंना धमकी)
हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने ही कारवाई केली आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल त्वरित कोणतेही वृत्त नाही. हुथी बंडखोरांच्या ‘अल-मसिराह’ (Almasirah Middle East) या वाहिनीनेही सना विमानतळावर हल्ला झाल्याची पुष्टी केली. इस्रायली टेलिव्हिजन चॅनेल्सनी सना शहरातून काळ्या धुराचे ढग उठत असल्याचे दाखवले. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये स्फोटांचे आवाज आणि धुराचे लोट दिसत होते.
हल्ल्यापूर्वी, इस्रायली लष्कराने सोशल मीडियावर लोकांना विमानतळ परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानतळ सोडा, तिथे राहणे जीवघेणे ठरू शकते. सोमवारी रात्रीही इस्रायलने येमेनच्या होदेइदा प्रांतावर हल्ला केला, ज्यामध्ये किमान १ जण ठार आणि ३५ जण जखमी झाले. हुथी गटाने दावा केला आहे की, होडेइदा बंदर आणि एका सिमेंट कारखान्यावर सहा हल्ले झाले.
प्रथम हुथी बंडखोरांनी तेल अवीवजवळील इस्रायलच्या मुख्य विमानतळाजवळ (बेन गुरियन, Ben Gurion) क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यामध्ये चार लोक जखमी झाले आणि काही काळासाठी उड्डाणे थांबवण्यात आली. बेन गुरियन विमानतळाजवळ जमिनीवर क्षेपणास्त्र आदळण्याची ही पहिलीच वेळ होती. गाझामधील पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ हुथी बंडखोर इस्रायलवर हल्ला करत आहेत. गेल्या एका वर्षात इस्रायलने अनेक वेळा हुथी बंडखोरांवर हल्ले केले आहेत. (Sanaa International Airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community