Israel Iran Conflict : इराणच्या नागरिकांना मोबाईलमधून व्हॉट्सअप डिलिट करण्याचे आदेश; काय आहे कारण ?

56

इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढत असून दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले वाढवले आहेत. (Israel Iran Conflict) याच दरम्यान इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इराणने आपल्या नागरिकांना व्हॉट्स अ‍ॅप डिलिट करण्याचे आदेश दिले आहेत. व्हॉट्स अ‍ॅपने इस्रायलला पाठवण्यासाठी वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला आहे, असा दावा करण्यात आला. यावर व्हॉट्सअपने एक निवेदन प्रसिद्ध करत आम्ही कोणत्याही सरकारला कोणतीही माहिती देत ​​नाही असे स्पष्ट केलं.

(हेही वाचा – Congress बनली मुस्लिम लीग २.०; काश्मीरमधील विकासाला काँग्रेसच्या नेत्याकडून विरोध; व्हिडीओ व्हायरल)

इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने मंगळवार, १७ जून या दिवशी लोकांना त्यांच्या स्मार्टफोनमधून व्हॉट्स अ‍ॅप काढून टाकण्यास सांगितले. व्हॉट्स अ‍ॅपने इस्रायलला गुप्तचर माहिती पाठवली आहे आणि ही माहिती इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद वापरू शकते, अशी शंका इराणने व्यक्त केली आहे.

दरम्यान, यावर व्हॉट्सअपने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. “लोकांना त्यांची सर्वात जास्त गरज असताना आमच्या सेवा ब्लॉक करण्यासाठी हे खोटे अहवाल एक निमित्त म्हणून काम करतील याची त्यांना चिंता आहे. व्हॉट्स अ‍ॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरते. याचा अर्थ असा की, दरम्यान कोणताही सेवा प्रदाता तुमचे संदेश वाचू शकत नाही” ,असं यामध्ये म्हटले आहे.

“आम्ही तुमचे अचूक स्थान ट्रॅक करत नाही. आम्ही प्रत्येकजण कोणाला मेसेज करत आहे याची नोंद ठेवत नाही आणि लोक एकमेकांना पाठवत असलेल्या खासगी संदेशांचा आम्ही मागोवा घेत नाही. आम्ही कोणत्याही सरकारला कोणतीही माहिती देत ​​नाही,” असे निवेदनात म्हटले आहे.

जगातील अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. इराण आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्व संकटाचा सामना करत आहे, तर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) देखील थांबत नाहीये. दरम्यान, G-7 शिखर परिषदेमुळे (G-7 Summit) कॅनडामध्ये (Canada) जागतिक नेत्यांची गर्दी जमली आहे. अशातच जागतिक हवाई वाहतुकीचा एक धक्कादायक फोटो समोर आला आहे. यामध्ये, विमानांनी जगातील बहुतेक देश पूर्णपणे व्यापले आहेत, तर 2 देशांसह 3 ठिकाणी ‘नो फ्लाय झोन’ देखील दिसत आहे. (Israel Iran Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.