Israel Hamas Conflict : दहशतवादाचे केंद्र असलेल्या गाझा पट्टीसाठी इस्लामी देश एकवटले; अरब लीगच्या बैठकीत केल्या ‘या’ मागण्या

88
Israel Hamas Conflict : दहशतवादाचे केंद्र असलेल्या गाझा पट्टीसाठी इस्लामी देश एकवटले; अरब लीगच्या बैठकीत केल्या 'या' मागण्या
Israel Hamas Conflict : दहशतवादाचे केंद्र असलेल्या गाझा पट्टीसाठी इस्लामी देश एकवटले; अरब लीगच्या बैठकीत केल्या 'या' मागण्या

गाझामधील विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम देशांनी इस्रायलविरोधात एकवटून ही कारवाई केली. (Israel Hamas Conflict) इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भात अरब लीगने तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अरब लीगने गाझा पट्टीतील अत्यावश्यक मूलभूत सुविधांमध्ये कपात करण्याचा इस्रायलचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगितले आहे. गाझा पट्टीतील मूलभूत सुविधा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी इस्रायलकडे करण्यात आली आहे. (Israel Hamas Conflict)

(हेही वाचा – Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरु)

हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अरब देशांमध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत. बुधवारी अरब लीग या २२ देशांच्या संघटनेने इजिप्तमधील कैरो येथे सदस्य देशांसोबत आपत्कालीन मंत्रीस्तरीय बैठक घेतली. परराष्ट्र मंत्र्यांमधील या बैठकीत गाझा पट्टीतील अत्यावश्यक मूलभूत सुविधांमध्ये कपात करण्याचा इस्रायलचा निर्णय अरब लीगने नाकारला. याला अन्यायकारक म्हणत इस्रायलने गाझा पट्टीतील मूलभूत सुविधा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. याव्यतिरिक्त अरब लीगने इस्रायलला आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणि दोन-राज्यांंमधील संघर्षांवर समाधानावरील वाटाघाटीकडे परत येण्याचे आवाहन केले आहे. याआधी सौदी अरेबियाने मंगळवारी कॅबिनेट स्तरावर बैठक घेतली होती. या बैठकीत सौदीचे राजे सलमान आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पॅलेस्टाईन, जॉर्डन आणि इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांसह इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संवाद साधला. (Israel Hamas Conflict)

अरब लीगने गाझा पट्टीला इस्रायलने घेराव घातल्याचा निषेध केला. बैठकीत अरब लीग सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर चर्चा केली. यावेळी मंत्र्यांनी इस्रायलकडे गाझावरील संपूर्ण नाकेबंदी उठवण्याची मागणी केली. अरब लीगने देखील इस्रायलला गाझाला वीजपुरवठा आणि पाणी बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.

इस्रायली सैन्याने गाझा पट्टीच्या वेढा घातल्याचा निषेध करत अरब लीगने म्हटले आहे की, मानवतावादी मदत तात्काळ गाझा पट्टीपर्यंत पोहोचू द्यावी. अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, अरब लीग इस्रायलला गाझा पट्टीत तात्काळ अन्न, इंधन आणि मानवतावादी मदत पाठवण्याचे आवाहन करते. हमासने शनिवारी इस्रायली शहरावर रॉकेट डागल्यापासून, इस्रायली सैन्य गाझा पट्टीला लक्ष्य करत आहे. विशेषत: हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक केली जात आहे. इस्रायलने गाझा पट्टीला पूर्णपणे वेढा घातला असून पाणी, अन्न आणि वीजपुरवठा खंडित केला आहे.

अरब लीग म्हणजे काय ?

22 मार्च 1945 रोजी ६ देशांनी मिळून अरब लीगची स्थापना केली. तत्कालीन अरब लीगचे सदस्य देश होते – इजिप्त, इराक, ट्रान्सजॉर्डन (जॉर्डन), लेबनॉन, सौदी अरेबिया आणि सीरिया. सध्या अरब लीगमध्ये 22 सदस्य आहेत. अल्जेरिया, बहरीन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, लिबिया, मॉरिशस. मोरोक्को, ओमान, पॅलेस्टाईन, कतार, सौदी अरेबिया, सोमालिया, सुदान, ट्युनिशिया, संयुक्त अरब अमिराती, येमेन, जिबूती, कोमोरोस आणि सीरिया हे देश त्यामध्ये मात्र सध्या सीरियाला अरब लीगमधून निलंबित करण्यात आले आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाबाबत सौदी अरेबियाने मंगळवारी ५७ मुस्लिम देशांच्या सहकार्य संघटनेची (ओआयसी) तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली. सौदी अरेबिया आणि त्याच्या सहयोगी देशांचे ओआयसीमध्ये वर्चस्व असल्याचे मानले जाते. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्द निर्माण करताना मुस्लिमांचे संरक्षण करणे, हा त्याचा उद्देश आहे. (Israel Hamas Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.