Chinmay Das : बांगलादेशात इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी बांगलादेश उच्च न्यायालयाने बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी मोठा निकाल दिला. ६ महिन्यानंतर अखेर जामीन मंजूर झाला आहे. न्यायमूर्ती मोहम्मद अतोअर रहमान आणि न्यायमूर्ती मोहम्मद अली रेझा यांच्या खंडपीठाद्वारे हा आदेश देण्यात आला. बांगलादेशस्थित द डेली स्टारच्या वृत्तानुसार सदर बाब उघडकीस आली. (Chinmay Das)
(हेही वाचा – BJP प्रदेश कार्यालयाच्या भाडे करारास मुदतवाढ)
दरम्यान, बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Former Prime Minister Sheikh Hasina) यांच्या राजवटीच्या समाप्तीनंतर, चिन्मय दास बांगलादेशातील अल्पसंख्याकांसाठी, विशेषतः हिंदूंसाठी एक प्रमुख आवाज म्हणून पुढे आले होते. यानंतर, २५ नोव्हेंबर रोजी, ढाका पोलिसांच्या गुप्तहेर शाखेने त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती.
अटकेनंतर त्याने २६ नोव्हेंबर रोजी चितगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला, तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. तेव्हापासून ते तुरुंगात होते. चिन्मय दास यांच्या वकिलाने त्याच्या जामिनासाठी न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या, परंतु त्या फेटाळल्या जात होत्या.
बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर येथे हिंदू समुदायाविरुद्ध हिंसक घटनांना सुरुवात झाली. यावेळी त्यांनी समुदायावर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला आणि हिंसक घटनांवर टीका केली. त्यांच्यावर बांगलादेशच्या ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप होता. त्याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा; WAVES Summit 2025 चे करणार उद्घाटन)
धर्माचा विजय!
बांगलादेशातील सनातनी समुदायासोबत होणाऱ्या गैरवर्तनाविरोधात आवाज उठवल्यामुळे इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांचा सरकारकडून अतोनात छळ करण्यात आला. अखेर त्यांची निर्दोष सुटका झाली. हा असत्यावर सत्याचा विजय आहे. अशा कठीण काळात आपल्या भक्ताचे रक्षण केल्याबद्दल श्रीकृष्णाचे आभार. हा धर्माचा विजय आहे. असे विधान पश्चिम बंगाल विधानसभा विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community