बंगाल हे दुसरे काश्मीर होतंय? काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक Vivek Agnihotri काय म्हणाले? वाचा…

236
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात एका चर्चासत्रात काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपट हे समाजमनावर परिणाम करणारे महत्त्वाचे माध्यम आहे. असे विधान केले. तसेच सौम्य पण प्रभावी शस्त्र म्हणून (सॉफ्ट पॉवर) चित्रपट माध्यमाचा वापर शक्य आहे. असे विधान प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी शनिवारी पुणे येथील संवाद आणि सेवागुंज फाउंडेशन (Samvad Ani Sevagunj Foundation Pune) आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स नंतर आता मी ‘बंगाल फाईल्स’ (Bengal Files) मधून हाच प्रयत्न पुढे नेला आहे, असेही ते म्हणाले. (Vivek Agnihotri)

(हेही वाचा – जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट ‘या’ जिल्ह्यात तयार होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Mann Ki Baat मध्ये केला उल्लेख)

दरम्यान पुणे येथे आयोजित केलेल्या ‘द २.५’ फ्रंट वॉर : इंडियाज सिक्युरिटी चॅलेंजेस अँड द रोल ऑफ सिनेमा’ या विषयावर बोलत होते. आरोह वेलणकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. याप्रसंगी पुणे संवादचे मनोज पोचट, अमित वसिष्ठ उपस्थित होते.

‘दुसर्या महायुद्धात जेव्हा अमेरिका उतरली, तेव्हा अमेरिकन सरकारने हॉलिवुडला एकत्र करून, विशिष्ट विचार प्रभावीपणे मांडणार्या चित्रपटांची निर्मिती करण्याचे आवाहन केले. लोकशाही, स्वातंत्र्याचे महत्त्व, समतेचे मूल्य अशा काही संकल्पना हॉलिवुडच्या चित्रपटांतून प्रभावीपणे मांडण्यात आल्या, ज्याचा जनमानसावर विलक्षण परिणाम झाला, हा इतिहास आहे. त्यामुळे चित्रपट माध्यम हे सॉफ्ट पॉवर म्हणून यशस्वी ठरू शकते, हे सिद्ध झाले. मी सुरवातीला मल्टिस्टारर व्यावसायिक मुख्य धारेत असलेले चित्रपट केले. पण चित्रपटांची ही सॉफ्ट पॉवर लक्षात येताच, मी काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स, बुद्धा इन ए ट्रफिक जॅम..आणि आता बंगाल फाईल्स..या चित्रपटांकडे वळलो,  असे अग्निहोत्री म्हणाले.

(हेही वाचा – Tej Pratap Yadav : आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादवांनी केली पुत्राची हकालपट्टी, ‘पुढील ०६ वर्षांसाठी…’)

बंगाल हे दुसरे काश्मीर?
बंगालविषयी चित्रपट करताना मी जो अभ्यास, संशोधन केले. जो प्रवास केला. बंगाली लोकांना भेटलो. कित्येकांशी संवाद साधला. बंगालमध्ये अनेक दिवस वास्तव्य केले. तळागाळापर्यंत पोचलो. तेव्हा बंगाल हे दुसरे काश्मीर होत आहे, असे माझे मत झाले आहे. वेळीच उपाययोजना करण्याची नितांत गरज बंगालमध्ये आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक पंजाबला प्राधान्य दिले. पंजाबी हिंदीत व्यवहार करतात, पण बंगाली भाषेपासून आपण लांब राहिलो.

(हेही वाचा – maharashtra rain alert : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा…)

शिक्षण, कला, साहित्य, समाजकार्य, राजकारण, अध्यात्म, तत्त्वज्ञान, नेतृत्व या सर्व बाबतींत अत्यंत पुढारलेला, प्रगत असा हा प्रांत माझ्या पुढील चित्रपटाचा विषय आहे. आपण प्रतिक्रिया देण्यापेक्षा आणि दुसर्याला छोटे ठरवण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी केली पाहिजे. आपल्या सर्व सामर्थ्याला इनोव्हेशनची मात्रा देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.