यात्रीगण कृपया ध्यान दें! दौंड-मनमाड स्थानकादरम्यानच्या कामांमुळे ‘या’ रेल्वे रद्द

94

दौंड-मनमाड काष्टी आणि बेलवंडी दरम्यान रेल्वेच्या सुरू असलेल्या विविध कामांमुळे मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे दिनांक ७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान विविध रेल्वे रद्द केल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.

(हेही वाचा – उद्धव गट आणि शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी कुणाला किती दिली पार्किंग?)

रद्द केलेल्या गाड्या

  • गाडी नं. २२१२४ अजनी – पुणे एसी एक्स्प्रेस ४, ११ आणि १८ ऑक्टोबर रोजी ; तर २२१२३ पुणे – अजनी एसी एक्स्प्रेस ७, १४ आणि २१ ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
  • गाडी नं. २२११७ पुणे – अमरावती एसी एक्स्प्रेस ५, १२ आणि १९ ऑक्टोबर रोजी; तर २२११८ अमरावती – पुणे एक्स्प्रेस ६, १३ आणि २० ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
  • गाडी नं. १२११४ नागपूर- पुणे गरीबरथ एक्स्प्रेस ४, ७, ९, ११, १४, १६ आणि १८ ऑक्टोबर रोजी ; तर गाडी नं. १२११३ पुणे – नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस ५, ८, १०, १२, १५, १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
  • गाडी नं. २२१३९ पुणे – अजनी एक्स्प्रेस ८ आणि १५ ऑक्टोबर रोजी ; तर गाडी नं. २२१४० अजनी – पुणे एक्स्प्रेस ९ आणि १६ ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
  • गाडी नं. २२१४१ पुणे – अजनी एक्स्प्रेस ६ आणि १३ ऑक्टोबर रोजी ; तर गाडी नं. २२१४२ अजनी – पुणे एक्स्प्रेस ७ आणि १४ ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
  • गाडी नं. ११४०९ पुणे – नजीबाबाद डेमू १६ ते १८ ऑक्टोबर आणि गाडी नं. ११४१० नजीबाबाद – पुणे १७ ते १९ ऑक्टोबर पर्यंत रद्द राहणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.