१९ मे रोजी पहाटे इराणने डागलेले एक क्षेपणास्त्र थेट इस्त्रायलच्या दक्षिणेकडील भागातील मुख्य रुग्णालय सोरोका मेडिकल सेंटरला (Soroka Medical Center) धडकले. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, या हल्ल्यात रुग्णालयाच्या अनेक भागांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. बेर्शेबा शहरात असलेले हे रुग्णालय १००० पेक्षा जास्त खाटांचे असून ते १० लाख लोकांना आरोग्य सेवा पुरवते. (Israel Iran Conflict)
(हेही वाचा – Raigad Rain : रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ! नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, शाळांना सुट्टी जाहीर)
इराणने तेल अवीववर (Tel Aviv) क्षेपणास्त्रे डागली आहेत, ज्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. इस्त्रायलने दावा केला आहे की, इराणने एकाच वेळी २५ क्षेपणास्त्रे इस्त्रायलवर डागली, ज्यामुळे संपूर्ण इस्त्रायल हादरले आहे. इराणच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये असलेल्या एका भारतियाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. उपजीविकेच्या शोधात इस्रायलला गेलेल्या तेलंगणातील (Telangana) ५७ वर्षीय व्यक्तीचा तब्येत बिघडल्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी बुधवारी दिली. रेवल्ला रविंदर (वय ५७ वर्षे) दोन वर्षांपूर्वी कामासाठी इस्रायलला गेले होते.
रविंदर यांच्या पत्नी विजया लक्ष्मी यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांचे पती सध्याच्या संघर्षामुळे आणि बॉम्ब हल्ल्यांच्या सततच्या आवाजामुळे खूप चिंतेत होते. घरी परत येऊ शकणार नाही, अशी भीती ते अनेकदा व्यक्त करत असत. त्यांना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मिळाली, जो या संघर्षामुळे निर्माण झालेल्या ताणतणाव आणि चिंतेमुळे आला असावा.
रविंदर यांची मुलगी आकांक्षा हिने सांगितले की, तिचे वडील भूमिगत बंकरमधून फोन करायचे आणि तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मृताच्या कुटुंबीयांनी सरकारला त्यांचा मृतदेह परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. तसेच, रविंदर हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने, त्यांनी सरकारकडे आर्थिक मदतीचीही विनंती केली आहे. रविंदर यांचा मुलगा बहिरा आणि मुका आहे. (Israel Iran Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community