Investment : ईशान्य भारतात 1 लाख 25 हजार कोटींची होणार गुंतवणूक

मुकेश अंबानी 75 हजार आणि गौतम अदानी 50 हजार कोटी गुंतवणार

38
Investment : ईशान्य भारतात 1 लाख 25 हजार कोटींची होणार गुंतवणूक

ईशान्य भारतातील 8 राज्यांमध्ये येत्या 10 वर्षात 1 लाख 25 हजार कोटींची गुंतवणूक (Investment) होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 5 वर्षात 75 हजार कोटी आणि अदानी समूह 10 वर्षात 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम येथे आयोजित रायझिंग नॉर्थ-इस्ट इन्व्हेस्टर्स समिट-2025 मध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानींनी याबाबत घोषणा केली.

याप्रसंगी मुकेश अंबानी यांनी अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसह ईशान्येकडील राज्यांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे धोरणात्मक व्हिजन सादर केले. भविष्यात, हे प्रदेश सिंगापूरसारख्या शेजारील देशांच्या यशाची प्रतिकृती बनलेले दिसतील असे अंबानी म्हणाले. तसेच ईशान्येकडील 8 राज्यांचा उल्लेख त्यांनी ‘अष्टलक्ष्मी’ असा केला. रिलायन्स इंडस्ट्रीज ईशान्येकडील राज्यांत गुंतवणूक (Investment) दुपटीने वाढवेल. सर्व शाळा, रुग्णालये आणि घरांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणेल. तसेच या प्रदेशात सौरऊर्जेची निर्मिती वाढवणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. ईशान्य भारतातील रिलायन्सची सध्याची गुंतवणूक 30 हजार कोटी रुपये आहे. आता ही गुंतवणूक 75 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची त्यांची योजना आहे.

(हेही वाचा – Conversion : रात्रीच्या अंधारात सुरु होते पाद्र्याकडून धर्मांतराचे कारस्थान; पोलिसांनी दोघांना केली अटक)

यासोबतच अदानी समूह आगामी 10 वर्षांत ईशान्य भारतात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) करणार असल्याची घोषणा अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केली. अदानी समूहाने 3 महिन्यांपूर्वी आसाममध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. यासोबतच गौतम अदानी यांनी आगामी 10 वर्षांत संपूर्ण ईशान्य भारतात 50 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली.

ही गुंतवणूक (Investment) विमानतळ, शहर गॅस वितरण, ट्रान्समिशन, सिमेंट आणि रस्ते पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये असेल. यावेळी गौतम अदानी म्हणाले की, गेल्या दशकात, ईशान्येकडील प्रदेशात भारताच्या विकासाच्या गाथेचा एक नवीन अध्याय उलगडत आहे. विविधता, लवचिकता आणि वापर न झालेल्या क्षमतेची ही एक गोष्ट आहे. या उदयामागे एका नेत्याची दूरदृष्टी आहे जो सीमेच्या मर्यादा मानत नाही. केवळ सुरुवात करतो. पंतप्रधान, तुम्ही जेव्हा पूर्वेकडे जलद आणि प्रथम लक्ष द्या, असे म्हटले, तेव्हा तुम्ही ईशान्येचे लक्ष वेधले असे अदानी यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.