Chinese Warships : तैवानच्या समुद्री सीमेत चीनच्या १० लढाऊ जहाजांची घुसखोरी

Chinese Warships : चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले होते की, अमेरिका आणि तैवान यांच्यातील सैनिकी संपर्क, तसेच तैवानला शस्त्र देण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना चीनचा कडाडून विरोध आहे.

115
Chinese Warships : तैवानच्या समुद्री सीमेत चीनच्या १० लढाऊ जहाजांची घुसखोरी
Chinese Warships : तैवानच्या समुद्री सीमेत चीनच्या १० लढाऊ जहाजांची घुसखोरी

तैवानच्या (Taiwan) राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, १ जूनला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास देशाच्या समुद्री भागांत चिनी नौदलाची १० जहाजे (Chinese Warships) आढळली. चीनच्या २ लढाऊ विमानांनी तैवानच्या सीमारेषेत घुसखोरी केली. तैवाननेही या परिसरात त्याच्या जहाजे आणि क्षेपणास्त्रे तैनात करून चीनला प्रत्युत्तर दिले.

(हेही वाचा – ३६ तासांचा mega block घेऊन CSMT आणि Thane स्थानकावर करण्यात आले ‘हे’ काम)

सप्टेंबर २०२० पासून चीन ‘ग्रे झोन’ (Gray Zone) रणनीती वापरून तैवानच्या आजूबाजूच्या भागांत लढाऊ विमाने आणि जहाजे यांची संख्या वाढवत आहे. ‘ग्रे झोन’ रणनीती म्हणजे बळाचा थेट आणि मोठ्या वापराविना सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न ! अलीकडेच अमेरिकेच्या खासदारांनी तैवानला भेट दिली होती. त्याला चीनने विरोध केला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले होते की, अमेरिका आणि तैवान यांच्यातील सैनिकी संपर्क, तसेच तैवानला शस्त्र देण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना चीनचा कडाडून विरोध आहे.

काय आहे चीन-तैवान संघर्ष ?

गेल्या काही वर्षांपासून चीन आणि तैवान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चीनने तैवानवर कधीही राज्य केले नाही, तरीही चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष (Communist Party) त्याला चीनचा भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश म्हणवतो. तैवान हे चीनच्या आग्नेय किनार्‍यापासून १०० मैल अंतरावर असलेले बेट आहे. तैवानची स्वतःची राज्यघटना आणि निवडून आलेले सरकार आहे. तथापि जगातील केवळ १४ देशांनी तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. (Chinese Warships)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.