International Yoga Day : योग दिनी समुद्र किनारी १०८ सूर्यनमस्कार

प्ले अॅण्ड शाईन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

105

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दादरच्या समुद्र किनारी अनोख उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. बुधवार, २१ जून रोजी दादर चौपाटी येथे १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्ले अॅण्ड शाईन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी किमान १०० जणांना सहभाग घेता येणार आहे. या दिवशी ज्यांना सूर्यनमस्कार घालणे शक्य होणार नाही. त्यांना इतर योगासने शिकवली जाणार आहेत. यानंतर अल्पाहाराची सोय करण्यात आली आहे. हा संपूर्ण उपक्रम मोफत असणार आहे. वर्षभर ही संस्था क्रीडा आणि आरोग्य याविषयावर शिबिर घेत असते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सार्थक वाणी यांनी दिली.

(हेही वाचा Biporjoy Cyclone : आज संध्याकाळपर्यंत गुजरातमध्ये धडकणार; एनडीआरएफची ३३ पथकं तैनात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.