International Space Station : खगोलप्रेमी, अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची पर्वणी; जाणून घ्या वेळ आणि दिशा

71
International Space Station : खगोलप्रेमी, अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची पर्वणी; जाणून घ्या वेळ आणि दिशा
International Space Station : खगोलप्रेमी, अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची पर्वणी; जाणून घ्या वेळ आणि दिशा

खगोलप्रेमी आणि अभ्यासकांसाठी (Astronomers and scholars) ही महत्त्वाची बातमी आहे. पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरणारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (International Space Station) ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान पाहता येणार आहे. सलग पाच दिवस हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची संधी मिळणार आहे. जाणून घ्या वेळ आणि दिशा यासंदर्भातील माहिती.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (International Space Station ) हा १६ देशांनी एकत्रित केलेला प्रकल्प असून त्याचा आकार फूटबॉलच्या मैदानापेक्षा मोठा असतो. सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर हे स्थानक एका दिवसात पृथ्वीच्या पंधरा प्रदक्षिणा पूर्ण करते. स्पेस स्टेशन ही एक विज्ञान प्रयोगशाळा आहे. अनेक देशांनी ते बांधण्यासाठी एकत्रितरित्या काम केले आहे. या अवकाश स्थानकाची कक्षा पृथ्वीपेक्षा सुमारे २५० मैल आहे.

(हेही वाचा – Nagar Road Construction: नगरमध्ये ३१५ किमीचे रस्ते तयार होणार, प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू

४ ऑक्टोबरला सायंकाळी ७.०३ वाजता क्षितिजापासून १४ किमी. अंशावर उत्तर ते पूर्व दिशेला दीड मिनिटे, ५ ला. रात्री ७.५० वाजता, २८ अंशावर वायव्य ते उत्तर बाजूस पावणेदोन मिनिटे, ६ रोजी रात्री ७.०२ पासून साडेचार मिनिटांपर्यंत ५४ अंशावर वायव्य ते आग्नेय दिशेला अतिशय चांगल्या स्वरुपात पाहता येणार आहे. ७ तारखेला रात्री ७.५२ वाजता पश्चिम ते नैऋत्य बाजूला क्षितिजाजवळ पावणेतीन मिनिटे १३ अंशावर आणि ८ ऑक्टोबरला रात्री ७.०३ वाजता पश्चिमेकडून दक्षिणेकडील आकाशात २८ अंशावर पावणेसहा मिनिटे बघता येईल. हे अनोखे आकाश दर्शन सर्वांनी घ्यावे, असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड ( Director of Vishwabharati Kendra, Prabhakar Dod ) यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.