INSAT-3D : इस्त्रोच्या हवामान उपग्रहाचे प्रक्षेपण : १९ मिनिटे १३ सेकंदांत पृथ्वीच्या वरच्या कक्षेत

इस्त्रोने नुकत्याच चंद्रयान-३, आदित्य एल-१ या सारख्या मोठ्या मोहीमा राबवल्या आहेत. तसेच INSAT-3D या उपग्रहांच्या (INSAT-3D) निर्मितीमध्ये भारतीय उद्योगांचे मोलाचे योगदान आहे. लिफ्ट ऑफ द्रव्यमान हे रॉकेटचे प्रारंभिक द्रव्यमान आहे.

165
INSAT-3D : इस्त्रोच्या हवामान उपग्रहाचे प्रक्षेपण : १९ मिनिटे १३ सेकंदांत पृथ्वीच्या वरच्या कक्षेत

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (Isro) शनिवार १७ फेब्रुवारी रोजी इन्सेट-3डीएस (INSAT-3D) या अत्याधुनिक हवामान उपग्रहाचे प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी ५:३५ वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. विशेष म्हणजे हे उपग्रह १९ मिनिटे १३ सेकंदात जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) म्हणजेच पृथ्वीच्या वरच्या कक्षेत पोहोचले.

(हेही वाचा – JP Nadda : मोदींच्या हमीवर जनतेचा विश्वास; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला दिल्लीत सुरुवात)

१० नोव्हेंबर २०२३ पासून INSAT-3DS च्या कंपन चाचण्या सुरू –

ISRO चे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, १० नोव्हेंबर २०२३ पासून INSAT-3DS च्या कंपन चाचण्या सुरू झाल्या होत्या. हे ६-चॅनेल इमेजर आणि १९-चॅनेल साउंडरद्वारे हवामानाशी संबंधित माहिती प्रदान करेल. हे शोध आणि बचावासाठी ग्राउंड डेटा आणि संदेश देखील रिले करेल.

(हेही वाचा – BMC : म्हाडासह इतर प्राधिकरणांच्या सार्वजनिक शौचालयांमध्ये पुरेशी विद्युत प्रकाशव्यवस्था पुरवा; चहल यांचे निर्देश)

जमीन, समुद्र, हवामान आणि इमर्जन्सी सिग्नल यंत्रणेची माहिती देणे होणार सोपे –

या उपग्रहाद्वारे जमीन, समुद्र, हवामान आणि इमर्जन्सी (INSAT-3D) सिग्नल यंत्रणेची माहिती देणे सोपे होणार आहे. सध्याच्या इन्सेंट मालिकेतील उपग्रहांची शक्ति आणि क्षमता वाढण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपग्रहांच्या साह्याने बचाव आणि मदत कार्य देखील राबवणे सोपे होणार आहे. या उपग्रहांमध्ये ३-ए, ३डी आणि ३डी प्राइम ही आधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. या द्वारे भारतातील हवामान बदलांची अचूक आणि वेळेवर माहिती देता येणार आहे. या उपग्रहाचे वजन हे २२७५ किलो आहे. या उपग्रहांच्या (INSAT-3D) निर्मितीमध्ये भारतीय उद्योगांचे मोलाचे योगदान आहे. लिफ्ट ऑफ द्रव्यमान हे रॉकेटचे प्रारंभिक द्रव्यमान आहे.

(हेही वाचा – Eknath Shinde: नक्षलवाद्यांनी खून करावा म्हणून झेड प्लस सुरक्षा नाकारली का? एकनाथ शिंदेंचा सवाल)

परदेशी संस्थांवरील अवलंबित्व कमी – 

INSAT-3DR हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यात मदत करत आहे. हा उपग्रह ३६,००० किलोमीटर उंचीवरून दर २६ मिनिटांनी पृथ्वीची छायाचित्रे घेत आहे. हे रेडिएशन, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, बर्फाचा पृष्ठभाग आणि धुके याबद्दल माहिती देते. हे जमिनीपासून ७० किमी उंचीपर्यंतचे तापमान मोजत आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचे परदेशी संस्थांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. (INSAT-3D)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.