Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; ‘या’ विधानामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता

पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे.

168
Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; "या' विधानामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता

विनोदाच्या माध्यमातून कीर्तन करणारे हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांनी कीर्तनादरम्यान केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता खंडपीठाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी शिर्डीतील ओझर इथे आपल्या कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, आणि विषम तिथीला संग झाला तर मुलगी होते अस वक्तव्य केलं होत. मात्र त्यांचं हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात १५६ (३) याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. त्यानंतर या निर्णयाला याचिककर्त्याने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. त्यामुळे आता खंडपीठाच्या आदेशानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – बीडमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार; दोन जण जखमी)

नेमकं काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदुरीकर?

स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी (Indurikar Maharaj) कीर्तनात म्हटलं होतं.

चार आठवड्याचा अवधी मिळणार

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी अवधी मागितला आणि तोपर्यंत गुन्हा दाखल करु नये अशी विनंती केली. या विनंतीवरुन औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराज यांना चार आठवड्याचा अवधी दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.