-
ऋजुता लुकतुके
पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर निर्माण झालेला तणाव सध्या निवळला असला तरी एकमेकांवर राजनैतिक कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही देशांकडून सुरूच आहेत. भारताकडून सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकिस्ताननेही त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांना वापरू द्यायला मनाई केली आहे. सुरुवातीला हा मर्यादा मे महिन्यापुरती होती. आता ती वाढवून जून महिन्यापर्यंत करण्यात आली आहे. (Indo – Pak Tension)
पाकिस्तानमध्ये जिओ न्यूजने ही बातमी दिली आहे. पाक सरकारकडून अधिकृत घोषणा लवकरच होईल, असं त्यांनी बातमीत म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आहे. त्या अंतर्गत, पाकिस्तानमधील ९ दहशतवादी केंद्रांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. १० मेला मध्यरात्री भारताने ही कारवाई केल्यानंतर उभय देशांमध्ये सीमेवर तणाव निर्माण झाला. अखेर चार दिवसांनंतर दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला आहे. (Indo – Pak Tension)
(हेही वाचा – Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांकडून भक्तिरसपूर्ण गायन व नृत्यवंदना !)
त्यानंतर ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले थांबले असले तरी राजनेतिक लढाया अजूनही सुरूच आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही असा इशारा पाकिस्तानला दिला आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानचं सरकार दहशतवादी तळ आणि संघटनांना पाठिंबा देत असल्याचे पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायाकडे सादर केले आहेत. भारतानेही आपली हवाई हद्द पाकिस्तानसाठी बंद केली आहे. (Indo – Pak Tension)
त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही सुरुवातीला २३ मे पर्यंत आपली हवाई हद्द भारतीय विमान कंपन्यांसाठी बंद केली होती. आता ही मुदत वाढवली आहे. यापूर्वी १९९९ चं कारगील युद्ध आणि २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेला बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या वेळीही पाकिस्ताने हवाई हद्द अशाच पद्धतीने बंद केली होती. (Indo – Pak Tension)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community