Indigo Airlines : इंडिगो एअरलाईन्सचा नवीन प्रवासी विक्रम, एका वर्षांत १० कोटी प्रवाशांनी केला प्रवास

भारतातील एखाद्या विमान कंपनीने प्रथमच एका वर्षात १० कोटी प्रवाशांचा आकडा गाठला आहे. 

139
Indigo Airlines : मुंबई- गुवाहाटी इंडिगो विमानाचे ढाका येथे इमर्जन्सी लँडिंग
Indigo Airlines : मुंबई- गुवाहाटी इंडिगो विमानाचे ढाका येथे इमर्जन्सी लँडिंग
  • ऋजुता लुकतुके

भारतातील एखाद्या विमान कंपनीने प्रथमच एका वर्षात १० कोटी प्रवाशांचा आकडा गाठला आहे. (Indigo Airlines)

देशातील आघाडीची खाजगी विमान कंपनी इंडिगो एअरलाईन्सने २०२३ या कॅलेंडर वर्षात १० कोटी प्रवाशांना विमान प्रवास घडवला आहे आणि हा एक नवीन विक्रम आहे. एका वर्षातील हा एका विमान कंपनीसाठीचा उच्चांक आहे. १८ डिसेंबरला इंडिगोने हा मापदंड ओलांडला. (Indigo Airlines)

‘भारतीयांच्या पसंतीची पहिल्या क्रमांकाची विमान कंपनी इंडिगो एअरलाईन्सने शिरपेचात आणखी एक तुरा खोचला आहे. एका कॅलेंडर वर्षात १० कोटी प्रवासी संख्या गाठणारी इंडिगो ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. जगातील काही निवडक कंपन्यांच्या पंक्तीत आता इंडिगो एअरलाईन्स बसली आहे. शिवाय प्रवासी वाहतुकीच्या निकषावर जगातील अव्वल दहा कंपन्यांमध्ये आता इंडिगो गणली जाईल,’ असं इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. (Indigo Airlines)

(हेही वाचा – Raj Kapoor Bungalow : राज कपूर यांच्या बंगल्याच्या जागी उभा राहणार ५०० कोटी रुपयांचा गोदरेज रहिवासी प्रकल्प)

२० नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग

कोव्हिड नंतरच्या काळात इंडिगो एअरलाईन्सने आपल्या सेवेचा विस्तार केला आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीने २० नवीन आंतरराष्ट्रीय मार्गही सुरू केले आहेत. तर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये बाली, मदेना, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया या देशातही कंपनी आपली विमान सेवा सुरू करणार आहे. (Indigo Airlines)

नोव्हेंबर महिन्यातील कंपनीचे आकडेही दमदार होते. महिन्यातील देशांतर्गत विमान प्रवाशांमध्ये ६१ टक्के हिस्सेदारी एकट्या इंडिगो एअरलाईन्सची होती आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एअर इंडियापेक्षा इंडिगोची प्रवासी संख्या सहापट जास्त होती. व्यस्त २०२३ नंतर कंपनी २०२४ मध्ये मात्र थोडी धिमी सुरुवात करणार आहे. सध्या कंपनीने आपली ४० विमानं सध्या बंद ठेवली आहेत. जानेवारीत आणखी ३० ते ४० विमानांना आणि स्टाफला विश्रांती देण्याचा कंपनीचा मानस आहे. (Indigo Airlines)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.