भारताची निर्यात पोहोचली विक्रमी 824.9 अब्ज डॉलर्सवर; Reserve Bank of India चा अहवाल

52
भारताची निर्यात पोहोचली विक्रमी 824.9 अब्ज डॉलर्सवर; Reserve Bank of India चा अहवाल

रिझर्व्ह बँकेने मार्च 2025 साठी सेवा व्यापाराबद्दल जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 2024-25 आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात 824.9 अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या 778.1अब्ज डॉलर्सच्या निर्यातीच्या आकडेवारीपेक्षा यावर्षीची निर्यात 6.01% ने जास्त आहे. हा देशाच्या निर्यातीमधला एक महत्वाचा टप्पा आहे. (Reserve Bank of India)

(हेही वाचा – शिंदेंच्या जाळ्यात ‘उरले-सुरले’ ही; Shiv Sena UBT मध्ये अस्वस्थता वाढली!)

सेवा निर्यातीच्या वाढीचा वेग वाढत राहिल्याने तिने 2024-25 मध्ये 387.5 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. हा आकडा मागील वर्षीच्या 341.1अब्ज डॉलर्स निर्याती पेक्षा 13.6% ने जास्त आहे. सेवा निर्यात मार्च 2024 मध्ये असलेल्या 30 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत मार्च2025 मध्ये 18.6 % ने वाढून 35.6अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली होती. (Reserve Bank of India)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack महाराष्ट्र सायबर विभागाची दमदार कामगिरी)

पेट्रोलियम उत्पादने वगळता व्यापारी मालाची निर्यात 2023-24 मध्ये 352.9अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. त्याच्या तुलनेत 2024-25 मध्ये ती 6% वाढून विक्रमी 374.1 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक बिगर-पेट्रोलियम माल निर्यात आहे. (Reserve Bank of India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.