Indians Earning : भारतीय श्रीमंत झाले; आर्थिक उत्पन्नात झपाट्याने वाढ 

दिवसेंदिवस देशात श्रीमंत लोकांची संख्या वाढत आहेत. गेल्या काही वर्षात देशात वर्षाला पाच लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवणाऱ्यांची संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे.

63
Indians Earning : भारतीय श्रीमंत झाले; आर्थिक उत्पन्नात झपाट्याने वाढ 
Indians Earning : भारतीय श्रीमंत झाले; आर्थिक उत्पन्नात झपाट्याने वाढ 
बीएनपी परिबा या आंतरराष्ट्रीय बँकेने आयटी विभागाच्या माहितीचे विश्लेषण केले आहे. (Indians Earning) अहवालानुसार कोविड महामारीच्या काळात लोकांच्या उत्पन्नात घट झाली होती; परंतु त्यानंतरच्या काळात लोकांच्या उत्पन्नात पाच पटीने वाढ झाली आहे. वार्षिक 5 लाख रुपये कमावणारे लोक 2012 च्या आर्थिक वर्षात 38 लाख होते. आर्थिक वर्ष 2021 मध्ये त्यात  5 पटीने वाढ झाली आहे. सध्या 1.8 कोटी लोक वर्षाला 5 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवत आहेत. गेल्या दशकभरात त्यांचे उत्पन्न वाढले असून, कर्ज फेडण्याची क्षमताही सुधारली आहे. याशिवाय उपभोग आणि गुंतवणुकीच्या पातळीवरही सुधारणा दिसून आली आहे. आयटी विभागाने 2021 पर्यंतची माहिती दिली आहे. (Indians Earning)
या अहवालात दिले आहे की, 5 लाख रुपये कमावणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी 5 लाख रुपयांपेक्षा कमी कमाई करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. 5 ते 10 लाख रुपये, 10 ते 20 लाख रुपये आणि 20 ते 50 लाख पगार असलेल्या करदात्यांची संख्या आर्थिक वर्ष 2012-21 दरम्यान अनुक्रमे 17.6 टक्के, 20.8 टक्के आणि 21.6 टक्क्यांनी वाढली आहे. 5 लाखांपेक्षा कमी पगार असलेल्या करदात्यांची संख्या 7 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढली आहे. याशिवाय, 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींची संख्या आर्थिक वर्ष 2021 मध्ये 72.2 टक्क्यांवर घसरली आहे, जी आर्थिक वर्ष 2012 मध्ये 86.8 टक्के होती. (Indians Earning)
उच्च-उत्पन्न कुटुंबांचे प्रमाण वाढले 
आयटी सेवा आणि वित्तीय सेवांसह सेवा क्षेत्राच्या ताकदीमुळे भारतातील उच्च-उत्पन्न कुटुंबांचे प्रमाण गेल्या दशकात वाढले आहे. हा भाग भारतातील श्रीमंत कुटुंबांचा एक छोटासा भाग आहे. त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या उत्पन्नामुळे ऑटोमोबाईल, वित्तीय सेवा, दागिने, हॉटेल्स, रिअल इस्टेट, सिगारेट, मल्टिप्लेक्स आणि रुग्णालये यासारख्या क्षेत्रांचा महसूल FMCG, मीडिया ब्रॉडकास्टिंग सारख्या क्षेत्रांपेक्षा वेगाने वाढत आहे. (Indians Earning)
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.