Indian Spending Habits : भारतीय लोक अन्नधान्यावर कमी, मनोरंजन आणि कपड्यांवर करतात जास्त खर्च

कौटुंबिक बजेट हे दुपटीपेक्षा जास्त वाढलंय.

112
Indian Spending Habits : भारतीय लोक अन्नधान्यावर कमी, मनोरंजन आणि कपड्यांवर करतात जास्त खर्च
Indian Spending Habits : भारतीय लोक अन्नधान्यावर कमी, मनोरंजन आणि कपड्यांवर करतात जास्त खर्च
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुटुंबांचा मासिक खर्च गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढला आहे. पण, यात कपडे आणि मनोरंजनावर होत असलेला खर्च अन्नधान्याच्या तुलनेत वाढला आहे. ही आकडेवारी केंद्रसरकारच्या सांख्यिकी विभागानेच जारी केली आहे. २०११-१२ मध्ये कुटुंबाचा अन्नधान्यावर होणारा खर्च हा ५१ टक्के होता. ती टक्केवारी आता ४६ टक्क्यांवर आली आहे. उलट कुटुबांचे इतर खर्च ४७ टक्क्यांवरून ५३ टक्क्यांवर आले आहेत.

शहरी भागात हे चित्र आणखी स्पष्ट आहे. २०११-१२ साली शहरी कुटुंबं अन्नधान्यावर ४२ टक्के रक्कम खर्च करत होती. तोच खर्च आता ३९ टक्क्यांवर आला आहे. उलट इतर खर्चाचं प्रमाण चक्क ६० टक्क्यांच्या वर गेलं आहे. इतर खर्च म्हणजे कपडे, प्रवास, पर्यटन आणि मनोरंजन इत्यादी. (Indian Spending Habits)

(हेही वाचा – Kolhapur Mahalaxmi Temple : जाणून घ्या महालक्ष्मी मंदिरातील ‘या’ प्रसिद्ध पाच उत्सवांबद्दल)

केंद्रसरकारच्या सांख्यिकी विभागाने ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत हे सर्वेक्षण केलं आहे. आणि यातील एक महत्त्वाचं निरीक्षण असं आहे की, कुटुंबांचा दरडोई मासिक खर्च हा ६,४५९ रुपये इतका आहे. २०११-१२ मध्ये हा खर्च २,६३० रुपये इतका होता. ग्रामीण भागात दरडोई खर्च हा २०११-१२ च्या १,४३० रुपयांच्या तुलनेत ३,७७३ रुपयांवर पोहोचला आहे. (Indian Spending Habits)

‘ग्राहकांच्या खर्चाचं विश्लेषण करणारा हा अहवाल देशातील कुटुंबांचा खर्च करण्याचा कल सांगतो. आणि याचा वापर देशातील वस्तू आणि सेवांसाठीच्या मागणीचा आढावा घेण्यासाठी केला जातो. इतकंच नाही तर केंद्रसरकार या डेटाच्या आधारे किरकोळ महागाई दर ठरवताना कुठल्या वस्तू आणि सेवांचा विचार करायचा ते ठरवत असतं,’ असं हा अहवाल जाहीर करताना केंद्रसरकारने म्हटलं आहे. (Indian Spending Habits)

पॅकेज फूड तसंच शीतपेयं यांचा खर्च आधीच्या तुलनेत वाढला आहे. शिवाय शाळा आणि कॉलेजचं शुल्कही वाढलं आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत मात्र फारशी दरवाढ झालेली नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.