N Valarmathi : इस्त्रोमध्ये शोककळा, चंद्रयान-3 मोहिम प्रक्षेपणावेळी आवाज देणाऱ्या एन. वलरमथी यांचं निधन

चेन्नई येथील रुग्णालयात ठेवण्यात आले होते

119
N Valarmathi : इस्त्रोमध्ये शोककळा, चंद्रयान-3 मोहिम प्रक्षेपणावेळी आवाज देणाऱ्या एन. वलरमथी यांचं निधन
N Valarmathi : इस्त्रोमध्ये शोककळा, चंद्रयान-3 मोहिम प्रक्षेपणावेळी आवाज देणाऱ्या एन. वलरमथी यांचं निधन

भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्या 64 वर्षाच्या होत्या. त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. चंद्रयान-3मोहिमेच्या प्रक्षेपणाच्यावेळी काउंटडाऊन करताना वलरमथी यांनी आवाज दिला होता. त्यांच्या निधनानंतर इस्त्रोमध्ये शोककळा पसरली आहे.

(हेही वाचा- Mumbai Darshan : बेस्टकडून पर्यटकांना होणारे ‘मुंबई दर्शन’बंद, ओपन डेक डबलडेकर बस ऑक्टोबरपासून सेवेतून हद्दपार)

इस्त्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रोचे शास्त्रज्ञ एन. वलरमथी या तामिळनाडूनतील अरियालूर येथील रहिवासी होत्या. त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात ठेवण्यात आले होते. 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चंद्रयान-3 लाँच करण्यात आले होते. चंद्रयान-3च्या यशस्वी प्रक्षेपणादरम्यान एन. वलरमथी यांनी काउंटडाउनसाठी त्यांचा आवाज दिला होता.

इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ.पी.व्ही.व्यंकटकृष्ण यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या उत्तर ध्रृवावर उतरलेले चंद्रयान 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.