Indian Railway : भारताने पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरण्याची रणनिती आखली आहे. पाकिस्तानने गुरुवारी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरुन भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा हवाई हल्ला भारताने यशस्वीरित्या परतवून लावला. पाकिस्तानच्या या नापाक कृतीला भारताने जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं. भारताच्या सैन्य दलांनी शुक्रवारी आपली क्षमता दाखवून दिली. पाकिस्तानने डागलेली मिसाईल्स, क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली. त्याचवेळी भारतानेही पाकिस्तानवर मिसाईल्स, ड्रोनद्वारे स्ट्राईक केला. भारतीय रेल्वे बोर्डायकडून आधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन सूचना जारी करण्यता आल्या आहेत. (Indian Railway)
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेने अनेक स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे. भारतीय रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे बोर्डाने (Railway Board) सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था या भारतीय लष्करी ट्रेनसेवांबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे बोर्डाने एक निवेदन जारी केले आहे. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करून सैन्याच्या ट्रेनबाबत गोपनीय माहिती मागू शकतात. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे की, लष्करी रेल्वे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीसोबत अशी माहिती शेअर करणे सुरक्षेचे उल्लंघन मानले जाईल आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरेल. अशा कोणत्याही कॉल किंवा संभाषणांपासून दूर राहण्याचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(हेही वाचा – India Pak War : मुंबईच्या साकीनाका परिसरात ड्रोन दिसल्याचा दावा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन)
दरम्यान, मिलिटरी रेल्वे (Military Railway) ही भारतीय रेल्वेची एक विशेष शाखा आहे जी सुरक्षा दलांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवते. त्यामुळे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलपासून सावध राहा. लष्करी ट्रेनशी संबंधित कोणतीही माहिती कोणालाही देऊ नका. कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा संपर्काची त्वरित तक्रार करा. प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करा, अशा सूचना रेल्वे बोर्डातर्फे देण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community