कतारमध्ये भारतीय नौदलाच्या (Indian Navy Officers) ८ अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणी भारतीय परराष्ट्राच्या कूटनितीला यश आले आहे. या अधिकाऱ्यांना कायदेशीर मदत मिळणार असल्याची माहिती, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय नौदलाच्या या अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाखाली भारताच्या ८ नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा झाली होती. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याविषयी सांगितले की, भारत सरकार माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना सर्व कायदेशीर आणि राजनैतिक मदत करणार आहे. आम्ही कुटुंबियांच्या वतीने याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या दोन सुनावणी झाल्या आहेत. या प्रकरणात आम्ही लक्ष ठेवून आहोत तसेच सर्व कायदेशीर सल्लागारांचे साहाय्यही घेण्याचाही समावेश करण्यात आला आहे.
३ डिसेंबर रोजी तुरुंगातील ८ जणांना भेटण्यासाठी कॉन्सुलर एॅक्सेस मिळाला असून त्यांची भेट घेतली. याशिवाय COP28 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर शेख यांची भेट घेण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
#WATCH | MEA Spokesperson Arindam Bagchi says, “You would have seen Prime Minister Modi meet Sheikh Tamim Bin Hamad, the Amir of Qatar in Dubai on the sidelines of CoP28. They’ve had a good conversation on the overall bilateral relationship as well as in the well-being of the… pic.twitter.com/PfcBKtKvnm
— ANI (@ANI) December 7, 2023
Join Our WhatsApp Community