भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर थेट हल्ला केला असल्याची शक्यता कमी; लेफ्ट. जनरल Vinod Khandare यांचे वक्तव्य

ऑपरेशन सिंदूर बाबत महत्त्वाचा खुलासा

123
भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर थेट हल्ला केला असल्याची शक्यता कमी; लेफ्ट. जनरल Vinod Khandare यांचे वक्तव्य

मुंबई : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यावर थेट हल्ला केला असल्याची शक्यता कमीच असे वक्तव्य संरक्षण मंत्रालयाचे माजी सल्लागार लेफ्ट. जनरल विनोद खंदारेंनी (Vinod Khandare) दिले आहे. ऑपरेशन सिंदूर बाबत रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यावर खरंच हल्ला केला का ? या प्रश्नावर आता नव्याने प्रकाश पडण्यास मदत होणार आहे.

(हेही वाचा – Nala Safai : मुंबईतील मोठ्या नाल्यातील सफाईचे काम १०५ टक्के; प्रशासनाने केला दावा)

लेफ्ट. जनरल खंदारेंनी (Vinod Khandare) या मुलाखतीत संपूर्ण घटनाक्रमाचे विश्लेषण मांडले आहे. ते म्हणाले की, युद्धाच्या परिणामांची चर्चा ही ते झाल्यानंतरच केली जाते, त्यासाठी आपल्याला सर्व संदर्भ बिंदू जोडावे लागतात. भारताने जेव्हा हल्ला केला, तेव्हा ज्या किराणा हिल्स भागात हा अण्वस्त्र साठा असल्याचे सांगितले जात आहे, त्या ठिकाणी मोठे भुकंपासारखे धक्के जाणवले. त्याचवेळी इजिप्तवरुन विमाने पाहणी करण्यासाठी आली होती. हे सगळं काय दर्शवतं. यावरुन हाच निष्कर्ष निघतो की तिथे काहीतरी मोठं झालं आहे.

(हेही वाचा – भारतासाठी अंतर्गत सुरक्षाही अत्यंत महत्त्वाची; माजी पोलीस महासंचालक Praveen Dixit यांचं परखड मत)

लेफ्ट. जनरल खंदारेंनी (Vinod Khandare) याच मुलाखतीत पुढे सांगितले की, “भारतीय लष्कराने निश्चितच आपली लक्ष्य ठरवत असताना, कधीच अण्वस्त्र साठ्याचे ठिकाण निवडले नव्हते. नूर खान एअरबेस येथे अण्वस्त्र साठ्याची नियंत्रण प्रणाली होती जी उद्ध्वस्त झाली आहे. परंतु याचा असा अर्थ होत नाही की भारतीय लष्कराने अण्वस्त्र साठ्यालाच लक्ष्य केले होते.” या मुलाखतीतून लेफ्ट. जनरल खंदारेंनी पाकिस्तानच्या कांगावखोर, सत्य न स्वीकारण्याच्या, बढाईखोर प्रवृत्तीलाही लक्ष्य केले. पाकिस्तान कधीच त्यांचा पराभव मान्य करणार नाही असेही लेफ्ट. जनरल खंदारेंनी आपल्या या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. यातून ऑपरेशन सिंदूर बाबत मोठा खुलासा होण्यास मदत होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.