ग्लोबल पॉवर रँकिंग २०२५ ची यादी नुकतीचं जाहीर झाली असून जगातील सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली लष्करी देशाची यादी समोर आली आहे. त्यानुसार, अमेरिका अव्वल क्रमांकावर असून, भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. लष्करी ताकद, तांत्रिक प्रगती, आर्थिक संसाधने आणि धोरणात्मक क्षमता या सर्व घटकांचा अभ्यास करून ही रँकिंग तयार करण्यात आली आहे. जीएफपीच्या अहवालानुसार, देशांचे पॉवर इंडेक्स स्कोअर हा या क्रमवारीचा मुख्य आधार आहे. या स्कोअरमध्ये जितका कमी आकडा, तितकी जास्त लष्करी ताकद असे मानले जाते. एकूण ६० हून अधिक निकष या गणनेत विचारात घेतले जातात – ज्यामध्ये सैन्यबलाची संख्या, हवाई दल, नौदल, टँक फोर्स, संरक्षण बजेट, रसद क्षमता, तांत्रिक नवोन्मेष आणि भौगोलिक स्थान यांचा समावेश आहे. (Most Powerful Countries)
(हेही वाचा – दाऊदी बोहरा मुसलमानांकडून Waqf Ammendment Law चे स्वागत; पंतप्रधान मोदींना भेटून मानले आभार)
ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी :
१) अमेरिका – जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेकडे २१.२७ लाख लष्करी जवान, १३,०४३ विमाने आणि ४,६४० रणगाडे आहेत. तसेच, जगभरातील लष्करी तळ, नौदलाची शक्ती आणि अत्याधुनिक हत्यारांचा संग्रह यामुळे तिचे वर्चस्व अद्याप अबाधित आहे.
२) रशिया – ३५.७ लाख जवान, ४,२९२ विमाने आणि ५,७५० रणगाड्यांसह रशिया दुसऱ्या स्थानावर आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपली लष्करी ताकद सतत सजग ठेवली असून, सर्वात मोठा टँक फोर्स त्याच्याकडे आहे.
३) चीन – चीनकडे ३१.७ लाख जवान, ३,३०९ विमाने आणि ६,८०० रणगाडे आहेत. हे देश सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लष्करी प्रणालींमध्ये गुंतवणूक करत आहे.
४) भारत – भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश असून, त्याची लष्करी ताकदही त्याच प्रमाणात वाढली आहे. भारताकडे ५१.३७ लाख लष्करी जवान, २,२२९ विमाने, आणि ४,२०१ रणगाडे आहेत. अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये भारताचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
५) दक्षिण कोरिया – उत्तर कोरियाच्या सततच्या धमक्यांमुळे सज्ज असलेला हा देश ३८.२० लाख जवान, १,५९२ विमाने आणि २,२३६ रणगाड्यांसह पाचव्या स्थानावर आहे. (Most Powerful Countries)
(हेही वाचा – West Bengal मधील हिंसाचारावरुन मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल; म्हणाले… )
६) युनायटेड किंग्डम – तुलनात्मक कमी संख्येच्या जवानांनाही, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सायबर क्षमतांच्या जोरावर यूके सहाव्या क्रमांकावर आहे.
७) फ्रान्स – ३.७६ लाख लष्करी कर्मचारी, ९७६ विमाने आणि २१५ रणगाड्यांसह फ्रान्सचा युरोपात मोठा प्रभाव आहे.,
८) जपान – १,४४३ विमाने आणि ५२१ रणगाड्यांसह, जपान एक आधुनिक आणि प्रगत लष्करी यंत्रणा विकसित करत आहे.
९) तुर्की – ८.८३ लाख जवान, १,०८३ विमाने आणि २,२३८ रणगाड्यांनी सज्ज, तुर्की मध्य पूर्वेतील एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो.
१०) इटली – २.८ लाख जवान, ७२९ विमाने आणि २०० रणगाडे असूनही, नाटोच्या प्रभावामुळे इटलीला दहावं स्थान प्राप्त झाले आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तान या यादीत टॉप १० मधून बाहेर पडला असून, तो बाराव्या क्रमांकावर आहे. त्याचा पॉवर इंडेक्स ०.२५१३ असून, एकूण १७.०४ लाख जवान त्यांच्याकडे आहेत.
जीएफपीचा हा अहवाल दर्शवतो की, लष्करी शक्ती ही केवळ सैन्यसंख्येवर नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, धोरणात्मक स्थान आणि संसाधन व्यवस्थापनावरही अवलंबून आहे. भारताची चौथ्या क्रमांकाची पोहोच लक्षणीय आहे, आणि येत्या काळात त्याची जागतिक लष्करी भूमिका आणखी बळकट होण्याची शक्यता आहे. (Most Powerful Countries)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community