India Pakistan War : भारताच्या विजयासाठी नाशिक येथे ‘युद्ध विजय यज्ञ’ संपन्न

140

अखिल भारतीय संत समिती (All India Sant Samiti) आणि धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रमुख स्वामी महंत डाॅ. अनिकेतशास्त्री यांच्या नेतृत्वाखाली ११ मे या दिवशी सकाळी महर्षि पंचायतन सिद्धपीठम आश्रमात ‘युद्ध विजय यज्ञ’ (Yudh Vijay Yagya) संपन्न झाला. (India Pakistan War) जागतिक शांती आणि भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणे, या उद्देशाने हा यज्ञ करण्यात आला.

(हेही वाचा – Indus Water Treaty : युद्ध थांबलं पण सिंधू जल कराराचे काय होणार ?)

महंत डाॅ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी हवन आणि यज्ञाद्वारे शांती आणि भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली. या वेळी कुष्मांड बली देतांना कोहळ्याच्या रूपात पाकिस्तानचा बली या यज्ञात देण्यात आला. या यज्ञाच्या वेळी भारतमातेचा जयघोष करण्यात आला, तसेच विश्वकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.

या वेळी जागतिक शांतीपाठाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक भाविकांना सहभाग घेऊन जागतिक शांतीसाठी प्रार्थना केली. महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, जागतिक शांतता आणि भारताच्या विजयासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. (India Pakistan War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.