India Pakistan War : “हमने भेजे कश्मीर में मुजाहिद…”; अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा बुरखा फाटला

India Pakistan War : आमच्या सैनिकांनी श्रीनगरमधील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला आहे, असे रौफ म्हणत असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

116

भारतीय लष्कराच्या आक्रमणात मुरीदके येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाजपठण हाफिज अब्दुल रौफ याने केले. तसेच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून पाकिस्तानी लष्कराच्या जिहादी चेहऱ्यावरील बुरखा फाटला आहे. (India Pakistan War)

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून बदला घेतला, या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यात मुरीदके (Muridke) येथील दहशवाद्यांचाही खात्मा झाला. येथील दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्करही उपस्थित असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा – IPL 2025 : भारत – पाक तणाव निवळल्यावर आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता, ३० मे ला अंतिम सामना?)

पत्रकार तल्हा सिद्दीकी यांनी अब्दुल रौफचा (Abdul Rauf) एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगच्या (Pakistan Markazi Muslim League) सोशल मीडिया पेजवर शेअर केला. या पोस्टला त्यांनी एक कॅप्शन दिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘आपल्या शिष्याच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व करणारे हाफिज अब्दुल रौफ काश्मीरमधील दहशतवादाचे गौरव करत आहे.”

व्हिडीओमध्ये काय म्हटले आहे ?

अब्दुल रौफ याच्या शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. मुस्लिमांना उद्देशून तो म्हणत आहे की, ‘आम्ही पाहिले आहे की, अमेरिका किती शक्तिशाली आहे. आपण रशियन योद्ध्यांना अफगाणिस्तानातून पळून जाताना देखील पाहिले आहे. १९६५ मध्ये भारताची वाईट अवस्था आपण पाहिली आहे. काश्मीरमध्ये आपल्या दोन मुजाहिदीनना दोन हजार लोकांशी लढताना पाहिले आहे. आमच्या सैनिकांनी श्रीनगरमधील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला आहे.’

भारतासह जगातील अनेक देश दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणत आहेत, पण पाकिस्तान आपल्या भूमीवर कोणत्याही दहशतवादी कारवाया होत असल्याचे नाकारत आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर या प्रकरणात पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे. (India Pakistan War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.