India Pakistan War : भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! – सनातन संस्था

40
India Pakistan War : भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! - सनातन संस्था
India Pakistan War : भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! - सनातन संस्था

सध्या चालू असलेल्या भारत-पाकिस्तान युद्धात (India Pakistan War) भारताचा विजय व्हावा म्हणून सनातन संस्थेच्या वतीने होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त २० ते २२ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत २५ पुरोहितांद्वारे शतचंडी यज्ञ करण्यात येणार आहे. हा यज्ञ सर्व नागरिकांसाठी खुला असून यात देशविदेशातील नागरीक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस (Chetan Rajahans) यांनी दिली.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांनी घेतला राज्यातील सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा; विविध निर्देश जारी)

फर्मागुडी, फोंडा, गोवा (Goa) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी हा १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत महोत्सव होणार आहे. या महोत्सवात २३ देशांतील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संप्रदायांचे संत-महंत, विविध राज्यांचे मंत्री, मंदिरांचे विश्वस्त आणि २५ हजारांहून अधिक साधक, हिंदु धर्मप्रेमी सहभागी होणार आहेत. या यज्ञात सहभागी होणारे लोक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणार आहेत. देवभूमी, तपोभूमी, अवतारभूमी आणि पृथ्वीवरील एकमेव सनातन राष्ट्र (Sanatan Rashtra) असलेल्या भारताच्या रक्षणासाठी अन् विजयासाठी होणार्‍या शतचंडी यज्ञाचे सप्तशतीचा सामूहिक पाठ, यज्ञविधी, आहुती आणि पूर्णाहूती आदी स्वरूप असणार आहे. २० मे रोजी दुपारी ४ ते रात्री ८; २१ मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ४ ते रात्री ८; २२ मे रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० या वेळेत हा शतचंड यज्ञ होणार आहे.

या यज्ञाआधी १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त राष्ट्र-धर्म आणि हिंदू समाजरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण प्रतिष्ठिंचे विचारमंथन, संतसभा आणि अन्य जागृतीपर कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट द्या !

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.